जगातलं सर्वात मोठं अॅक्वारियम तुटलं.. १५०० हून अधिक जिवांचा मृत्यू

बर्लिन: बर्लिनमध्ये शुक्रवारी पहाटे सुमारे ५.४५ च्या सुमारास तब्बल ४६ फुटी अॅक्वारियम फुटले. रॅडिसन ब्लू हॉटेलमधला हा प्रकार आहे, या हॉटेलच्या लॉबी मध्ये एक ४६ फुटी सिलेंड्रीकल मोठं अॅक्वारियम होतं.हे जगातल्या सर्वात मोठ्या सिलेंड्रीकल अॅक्वारियमपैकी एक होते. शुक्रवारी अर्थात १६ तारखेला सकाळी ५.४५ वाजता हे अॅक्वारियम फुटल्याची घटना घडली. हे अॅक्वारियम या हॉटेलची खासियत आणि सेंटर ऑफ अट्रॅक्शन होत. यात जवळजवळ १५०० वेगवेगळ्या प्रजातीचे मासे राहत होते. हॉटेल मालकांनी सांगितलेल्या माहिती नुसार, याच कारण अजून अस्पष्ट आहे.



अजून थोडासा उशीर अन् अजून लाखोंचा मृत्यू

हॉटेल तसं बरच मोठं आहे त्यामुळे इथे लोकांची खूप गर्दी असते, जर ही घटना एक तास नंतर घडली असती तर माश्यांसोबत माणसांचीही हानी झाली असती. व्हिडिओ मध्ये फक्त मोकळी टाकी आणि पाण्याने भरलेली लॉबी दिसते आहे. पोलिसांनी सांगितले की, इमारतीच्या हॉटेल आणि कॅफे एरिया मध्ये पाणी शिरलं आहे. हे पाणी जवळजवळ 1 दशलक्ष लिटर (264,000 गॅलन) असल्याचा अंदाजा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने