मस्क यांच्याकडून राजीनाम्याचे संकेत? थेट ट्विटरवरुन विचारला प्रश्न

अमेरिका : इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यापासून कायम चर्चेत आहेत. आता तर ते ट्विटरला रामराम करण्याच्या विचारात आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण त्यांनीच थेट ट्विटरवरुन एक प्रश्न विचारला आहे.टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतल्यानंतर अनेक धक्कादायक निर्णय घेतले जात आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वी मस्कने हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनेकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. मस्कच्या या निर्णयाविरोधात जगभरातून टीकेची झोड उठली होती. कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या निर्णयानंतर आता पुन्हा मस्क एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारील असल्याचे सांगितले जात आहे.



मी ट्विटरच्या प्रमुख पदावरुन पायउतार व्हावे का? असा थेट प्रश्न इलॉन मस्क यांनी ट्विटरवरच विचारला आहे. त्यांच्या या प्रश्ननामुळे खळबळ उडाली आहे. ते खरंच राजीनामा देतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.मस्क यांनी ट्विटरवर एक नवीन पोल सुरु केला आहे. याच माध्यमातून त्यांनी थेट जनतेला प्रश्न विचारला आहे. लोक जी भूमिका घेतील त्याचं मी पालन करणार असल्याचंही मस्क यांनी जाहीर केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने