किव्हमध्ये विजेअभावी पुन्हा अंधार

 किव्ह : रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने केलेल्या सर्वांत मोठ्या हल्ल्यांपैकी एक शुक्रवारी (ता.१६) झाला. रशियाने काल एकाच दिवशी ७० पेक्षा अधिक क्षेपणास्त्र डागली. या हल्ल्यांमुळे किव्हमधील अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाला आहे. किव्ह हे देशातील दुसरे शहर आहे जेथे आपत्कालीन ‘ब्लॅकआउट’ लागू करणे भाग पडले आहे, असे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.ध्य क्रिव्ही रिहमधील इमारतीवरील हल्ल्यात तीन जण ठार झाले तप दक्षिणेकडील खेरसॉनमध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. रशियाने ताब्यात घेतलेल्या पूर्व युक्रेनमध्ये तैनात केलेल्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार युक्रेनच्या गोळीबारात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. युक्रेनवर आक्रमण करून सहा महिने उलटून गेले असून रशियाच्या फौजा आक्रमकपणे हल्ले करीत आहेत. युद्ध थांबविण्याचे आवाहन अनेक देशांनी केले तरी रशियावर कोणताच परिणाम झालेला दिसत नाही.



मूलभूत सुविधा लक्ष्य

रशियाने पूर्वी केलेल्या हल्ल्यांनंतर युक्रेनमध्ये वीज आणि पाण्याअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीत नुकतीच सुरळीत झाली होती. पण सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे निर्माण होणाऱ्या बिकट स्थितीतून बाहेर पडणे कठीण होत आहे. हल्ल्यांमुळे विजेचे नुकसान होत असल्याने युक्रेनवर पाच लाख वीज जनरेटर आयात केले आहेत. पण सध्या येथे हिवाळा असल्याने कडाक्याच्या थंडीत निभाव लागण्यासाठी हजारो मोठे आणि शक्तीशाली जनरेटरची गरज युक्रेनला आहे. युक्रेनमधील मूलभूत सेवांचे जाळे क्षेपणास्त्राच्या माऱ्याने उद्‍ध्वस्त करण्याचे लक्ष्य रशियाने गेल्या दोन महिन्यांपासून ठेवले आहे. पण कालच्या हल्ल्यांत युक्रेनचे मोठा फटका बसला आहे.युक्रेनमधील एकूण लोकसंख्येच्या एक तृतीयांश रहिवाशांनाच घरात पाणी आणि ऊबदार हवा असे दोन्ही आणि ४० टक्के वीज उपलब्ध होत आहे. शहरातील वाहतुकीचे प्रमुख साधन असलेली मेट्रो व्यवस्था बंद आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने