काहीही झालं तरी मेस्सीच होणार चॅम्पियन! सांगणारा मॉर्डन नॉस्ट्रेडेमस आहे तरी कोण?

कतार : लियोनेल मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्ड कप होता. जगभरामध्ये आपल्या खेळामुळे असंख्य चाहते असणाऱ्या या खेळाडूच्या शेवटच्या सामन्याला प्रेक्षकांनी मोठी उपस्थिती लावली होती. त्याचा निरोप समारंभही मोठ्या दिमाखात झाला. त्याच्यासह लाखो चाहत्यांना यावेळी अश्रु अनावर झाले होते.मेस्सीच्या बाबतीत एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्याकडे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे. काहीही झालं तरी मेस्सी हाच चॅम्पियन होणार अशी भविष्यवाणी एकानं केली होती. त्यामुळे मेस्सी तर चर्चेत आहेच पण ज्यानं ती भविष्यवाणी केली होती तो देखील भलताच चर्चेत आला आहे. मेस्सीनं फ्रान्सला पेनल्टी शुटआऊटमध्ये हरवून विश्वकपवर आपल्या नावाची मोहोर उमटवली. त्या पेनल्टी किकनं साऱ्या फुटबॉल चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.




लाखो चाहत्यांनी मेस्सीवर कौतूकाचा वर्षाव केला. गेल्या काही दिवसांपासून लियोनेल मेस्सी आणि त्याचा शेवटचा वर्ल्ड कप यावर चर्चा होत होती. काहीही झालं तरी तो त्याच्या देशाला वर्ल्ड कप जिंकून देणार याविषयी बोललं जातं होतं. कालची मॅच झाली आणि मेस्सीनं साऱ्या चाहत्यांना खूश केलं. अर्जेटिनानं फ्रान्सवर चार- दोन अशी मात केली. अर्जेटिनानं तिसऱ्यांदा वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. भलेही आता मेस्सीवर सगळ्यांकडून कौतूकाचा वर्षाव होत असला तरी हे होणारचं होतं अशी भविष्यवाणी एकाने केली होती.मेस्सीबाबत भविष्यवाणी करणारा जो ज्योतिषी आहे सॅलोम अॅथॉस. त्यानं यंदाचा फिफा कोण जिंकणार आणि त्यामध्ये कोणता खेळाडू लक्षवेधी ठरणार याविषयी भविष्यवाणी केली होती. अर्जेटिंनाचा विजय आणि त्यात मेस्सीची चमकदार कामगिरी यामुळे सॅलोम चर्चेत आला आहे. त्यानं सांगितलं होतं की, मेस्सीच्या कॅप्टन्सीमध्ये अर्जेटिना फायनलमध्ये प्रवेश करणार आणि तो सामना जिंकणार. फ्रान्स विरुद्ध तो सामना होणार असेही त्यानं सांगितले होते. मेस्सीच्या टीमनं जेव्हा क्रोएशियाला हरवून फायनलमध्ये धडक मारली आणि दुसरीकडे फ्रान्सनं मोरक्कोला पराभूत केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने