राज्यसभेत सीतारामन व काँग्रेस सदस्यांत बाचाबाची

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाला ‘सामान्य माणसाची, त्याच्या समस्यांची काळजीच’ नाही, असे सांगणाऱया अर्थमंत्री निर्मला सीतारामन व काॅंग्रेस सदस्यांत राज्यसभेत आज पुन्हा जोरदार शाब्दीक चकमक उडाली.चीनच्या कुरापतीच्या मुद्यावर चर्चेच्या मागणीसाठी राज्यसभेत गदारोळ करणाऱया व आपल्या बोलण्यात व्यत्यय आणणाऱया काँग्रेस सदस्यांना फटकारताना सीतारामन संतप्त झाल्या होत्या. शून्य प्रहरात तृणमूल काँग्रेस नदीम उल हक यांनी, सामान्यांना सुलभ कर्जाचे अमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱया मोबाईल मोबाईल अप्सला वेसण घालण्याचा मुद्दा मांडाल होता.हक यांनी सांगितले की अशा ११०० पैकी ६०० मोबाईल अप बेकायदा आहेत. यातील बहुतांश चिनी आहेत. कर्ज परत न केल्यास ते कर्जदारांना छळ करतात. अनेक कर्जदारांनी या छळाला कंटाळून आत्महत्या कली आहे. कर्जदारांना फसवणाऱया या मोबाईल मोबाईल अप वर अर्थमंत्रालयाने तातडीने बंदी घालावी.



हा मुद्दा गंभीर असल्याचे सांगून सीतारामन यांनी हक यांना उत्तर दिले. त्या म्हणाल्या की हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. कर्जाच्या जाळ्यात अडकवून सर्वसामान्य व गरीब लोकांचा छळ करणाऱया चिनी मोबाईल अॅपचा मुद्दा गंभीर आहे. मागच्या ६ महिन्यांपासून अर्थमंत्रालयाने रिझर्व बॅंकेबरोबर, विदेश मंत्रालयाबरोबर व मेटीबरोबर अनेक बैठका घेऊन या अपवर कठोर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याच वेळी रणदीप सुरजेवाला व अन्य कांग्रेस सदस्यांनी गोंधळ सुरू केला.

चीनच्या मोबाईल अपवर हे सरकार बोलते पण चीनच्या घुसखोरीवर संसदेत चर्चेपासून पळ काढते असे सुरजेवाला व प्रमोद तिवारी यांनी सांगितले. त्यामुळे सीतारामन यांच्या बोलण्यात व्यत्यय येताच त्या भडकल्या. त्यांनी सांगितले की पंतप्रधान मोदींना सामान्य माणसाच्या फसवणुकीची चिंता आहे व ते या मोबाईल अॅपवर वेसण घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. पण काँग्रेस सदस्य माझ्या बोलण्यात व्यत्यय आणत आहेत. काँग्रेस काय हे सिध्द करू इच्छिते की सामान्य माणसाच्या प्रश्नांचे त्यांना देणेघेणेच नाही ? काँग्रेस पक्षाने सामान्यांच्या प्रश्नांपासून स्वतःला दूर केले त्याचे हे निदर्शक आहे. यावर वरिष्ठ सदनातील वातावरण पुन्हा तापले.

काँग्रेसने शेतकऱयांना फसवले- तोमर

प्रश्नोत्तर तासात दीपेंद्र हुडा यांच्या कृषी मंत्रालयाबबातच्या प्रश्नावरून कृषीमंत्री नरेंद्र तोमर व काँग्रेस सदस्यांत पुन्हा चकमक उडाली. हुडा यांच्या आरोपावर तोमर म्हणाले की शेतकऱयांना काँग्रेस कायम फसवले आहे. तीन कृषी कायद्यावरही काँग्रेस शेतकऱयांना आंदोलनासाठी चिथावले. आंदोलनानंतर संयुक्त समिती स्थापन झाली आहे व ते शेतकऱयांच्या मागण्यांवर विचार करत आहेत. त्या समितीच्या सदस्यांवर, ते विदेशात गेले असा आरोप करणे अत्यंत गैर आहे असे तोमर म्हणाले. त्यांनंतर काॅंग्रेस सदस्यांनी सभात्याग केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने