रशियाच्या दोन हवाई तळांवर हल्ले

रशिया: रशियाने डागलेली ७० पैकी ६० पेक्षा जास्त क्षेपणास्त्रे यशस्वीरीत्या भेदल्याचा दावा युक्रेनच्या हवाई दलाने केला. दुसरीकडे त्याआधी रशियाच्या अंतर्गत भागातील दोन हवाई तळांवर स्फोट झाले. युक्रेनचे दोन ड्रोन हल्ले परतावून लावल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला. तीन सैनिक ढिगाऱ्याखाली दबून मृत्युमुखी पडल्याचे व इतर चार जखमी झाल्याचेही रशियाकडून सांगण्यात आले. काळ्या समुद्रातील ओडेसा या बंदराला रशियाने लक्ष्य केले होते. त्या शहरासह युक्रेनमध्ये नव्या हल्ल्यामुळे अनेक घरे, इमारती पडल्या, नागरिकांचा बळी गेला, तर वीज आणि पाणी पुरवठा खंडित झाला.



रशियाने दक्षिणेकडील रोस्तोव विभागातून कॅस्पियन समुद्रात ३८, तर काळ्या समुद्रात २२ क्षेपणास्त्रे सोडल्याचा दावा युक्रेनच्या हवाई दलाने केला. पश्चिम रशियातील सारातोव विभागातील व्होल्गा नदीच्या किनाऱ्यावरील तसेच रीयाझन विभागातील द्यागीलेवो या तळावर हल्ले झाले. याबाबत युक्रेनकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. या हल्ल्यांमुळे युद्ध भडकण्याचा धोका निर्माण झाला आहे.

झेलेन्स्की यांचा निर्धार

युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमीर झेलेन्स्की यांनी नेहमीप्रमाणे लष्कराची प्रशंसा केली. वीज अभियंत्यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु सुद्धा केले आहेत. आमची जनता कदापी हार मानत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने