बाबासाहेब आंबेडकरांचं भगवं पोस्टर लावल्याप्रकरणी हिंदू संघटनेच्या नेता अटक

तामिळनाडू: भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरवरून वाद निर्माण झालाय. पोस्टरमध्ये आंबेडकरांना भगव्या कपड्यात दाखवण्यात आलं असून कपाळावर टिळा लावण्यात आला आहे. हे पोस्टर तामिळनाडूच्या  कुंभकोणममध्ये हिंदू मक्कल काचीनं लावलं आहे.



हिंदू मक्कल काचीचे संस्थापक अर्जुन संपत म्हणाले, आंबेडकर हे राष्ट्रीय नेते आहेत. जनजागृती करण्याच्या उद्देशानं हे करण्यात आलं आहे. खासदार तोलकप्पियन थिरुमावलवन यांनी हे पोस्टर ट्विट करून प्रश्न उपस्थित केले आहेत. हे पोस्टर आंबेडकरांना बदनाम करण्याचा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलंय. थिरुमावलवन म्हणाले, 'पोस्टरमध्ये भगवे कपडे घालून आंबेडकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आंबेडकरांनी विष्णू किंवा ब्रह्मदेवाची पूजा करण्यास नकार दिला होता. भगव्या कपड्यात आणि कपाळावर विभूती लावून आंबेडकरांचं पोस्टर लावणाऱ्या अशा धर्मांधांना ताबडतोब अटक करावी.'

अर्जुन संपत पुढं म्हणाले, जागरुकता निर्माण करण्यासाठी आंबेडकरांचं हे पोस्टर लावण्यात आलं आहे. थिरुमावलवन यांचं स्वतःचं मत आहे, पण सत्य हे आहे की आंबेडकर हे भगवेप्रेमी होते. भगव्याचं प्रतीक असलेल्या बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला होता. दरम्यान, तामिळनाडूतील कुंभकोणम येथून एका तमिळ हिंदू समर्थक नेत्याला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली. पोस्टरमध्ये आंबेडकरांना भगवा शर्ट घातलेलं आणि कपाळावर टिळा लावलेलं दाखवण्यात आलं आहे. हिंदू मक्कलचे सरचिटणीस गुरुमूर्ती असं अटक करण्यात आलेल्या नेत्याचं नाव आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने