घरवापसी मोहीम यापुढेही सुरू राहणार; विहिंप

 नवी दिल्ली - हिंदू धर्मात परत आलेल्या लोकांच्या उपस्थितीत विश्व हिंदू परिषदेतर्फे धर्म रक्षा दिवस नुकताच साजरा करण्यात आला. हे सर्वजण प्रेमाने नव्हे, तर दहशतीमुळे, भीतीपोटी, बळजबरीने इतर धर्मात गेले होते, आज ते घरी परतले आहेत असे संत रामानुजाचार्य यांनी सांगितले व घरवापसी मोहीम यापुढेही सुरू राहील असेही ते म्हणालेत.विहिंपचे केंद्रीय मंत्री सुधांशू पटनायक म्हणाले की चर्च वाहिनी आणि इमाम- मौलवींद्वारे आजही देशात सातत्याने हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. १९६६ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या विहिंप संमेलनात संतांनी घरवापसीचा मार्ग तयार केला. या मोहीमेत आतापावेतो किमान ९ लाख लोकांना हिंदू धर्मात परत आणले गेले आहे आणि ६२ लाख लोकांना धर्मपरिवर्तनापासून वाचवले गेले आहे असाही त्यांनी दावा केला.



ज्येष्ठ विहिंप नेते सुरेंद्र गुप्ता यांनी सांगितले की ‘आपल्या‘ला चार डोक्याच्या राक्षसाबरोबर सुरू असलेली लढाई जिंकायची आहे. त्याचे एक डोके साम्यवादी चीन आहे, दुसरे डोके भांडवलशाही अमेरिका आहे, तिसरे पाकिस्तान व सीरिया प्रेरित जिहाद आहे आणि व्हॅटिकन प्रेरित ख्रिश्चन धर्मांतर हे त्याचे चौथे मस्तक आहे. संपूर्ण जगाला या राक्षसापासून वाचवण्याची जबाबदारी भारतवर्षाच्या नेतृत्वाखालील हिंदू समाजाची असून हिंदू समाजाला संघटित करण्याची जबाबदारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने