"सिंगापूर म्हणजे स्वच्छ रस्ते आणि भारत म्हणजे..." नारायणमूर्तीनी केली तुलना

मुंबई : इन्फोसिसचे संस्थापक एन.आर. नारायण मूर्ती यांनी रविवारी कार्यक्रमात म्हणले की, भारतातील वास्तव म्हणजे भ्रष्टाचार, गलिच्छ रस्ते आणि प्रदूषण. तर सिंगापूर म्हणजे स्वच्छ रस्ते आणि प्रदूषणमुक्त वातावरण असा होतो.विझियानगरम जिल्ह्यातील राजम येथे 'जीएमआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'च्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या समारंभात ते बोलत होते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना, नारायण मूर्ती म्हणाले की, एखाद्याने कोणत्याही संकटाकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे.




एन.आर नारायण मूर्ती यांनी संस्थेच्या एका प्रेस रिलीझमध्ये म्हणाले की 'भारतातील वास्तव म्हणजे भ्रष्टाचार, गलिच्छ रस्ते, प्रदूषण आणि काही वेळा वीज नाही. मात्र, सिंगापूरमधील वास्तव म्हणजे स्वच्छ रस्ते, प्रदूषणमुक्त वातावरण आणि पुरेशा विजेची उपलब्धता.त्यामुळे ते नवे वास्तव घडवण्याची जबाबदारी आपली आहे. नारायण मूर्ती पुढे म्हणाले की, तरुणांनी समाजात बदल घडवून आणण्याची मानसिकता विकसित केली पाहिजे, वैयक्तिक हितापेक्षा सार्वजनिक, समाज आणि राष्ट्राचे हित जपायला शिकले पाहिजे.

जीएमआर समूहाचे अध्यक्ष जीएम राव यांचे उदाहरण देत एन.आर. नारायण मूर्ती यांनी विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शक्य असेल तेव्हा उद्योजक बनून अधिकाधिक रोजगार निर्माण करण्याचे आवाहन केले.नारायण मूर्ती म्हणाले की, गरिबी हटवण्याचा आणि समाजातील उपेक्षित घटकांना मदत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अधिक रोजगार निर्माण करणे. तर जीएमआर ग्रुपचे अध्यक्ष जीएम राव म्हणाले की, नारायण मूर्ती हे तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत. ते माझ्या टीमसाठी, सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी एक प्रेरणा आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने