फिफामध्ये दीपिका.. ट्रोलर्सला थप्पड की शाहरूखची सेटिंग..

मुंबई : सगळ्यांचे लक्ष अनेक दिवसांपासून वेधून असलेला फिफा विश्वचषक 2022 फूटबॉल अंतिम सामाना काल कतारच्या लुआस स्टेडियमवर अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात रंगला. या सामन्यात अर्जेंटिनाने बाजी मारली. यावेळी अभिनेत्रीने दीपिका पदुकोणने फिफा विश्वचषक 2022 ची ट्रॉफी लाँच करून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. गेले काही दिवस 'पठाण' चित्रपटातील बिकिनी प्रकरणावरून तिला प्रचंड ट्रोल केले गेले. पण त्यानंतर दीपिकाला मिळालेला हा मान म्हणजे ट्रॉलर्सच्या तोंडात थप्पड आहे की 'पठाण'चित्रपटासाठी शाहरुखने केलेली सेटिंग.. अशा चर्चांना उधाण आले आहे.



शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण यांचा आगामी चित्रपट 'पठाण' गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आला आहे. बेशरम गाणं आणि त्यामध्ये दीपिका पदुकोणने घातलेली भगव्या रंगाची बिकनी यावर प्रचंड चर्चा होत आहे. इतकेच नव्हे तर या भगव्या रंगाच्या बिकनीमुळे हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्याचा देखील आरोप होत आहे. यावरून देशभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून मोठा गदारोळ माजवला जात आहे. 'पठाण'चित्रपट रिलीज झाला तर थिएटर पेटवून देऊ अशीही धमकी निर्मात्यांना देण्यात आली. अशा परिस्थितीत ट्रॉलरकडे दुर्लक्ष करत दीपिकाने एक मोठा मान मिळवला आहे.

नुकत्याच झालेल्या फिफा वर्ल्ड कपमध्ये दीपिकाने 165 कोटी रुपयांच्या ट्रॉफीचे अनावरण केले. हा प्रसंग सर्वच भारतीयांसाठी मोलाचा होता. पण आता वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. 'पठाण' वादावर पडदा घालण्यासाठी दीपिका पदुकोणची निवड केली आहे का? कतारमध्ये शाहरूख खानच्या चाहत्यांची संख्या कमी नाही, त्यामुळे तर शाहरूखने सेंटिग लावली आहे की काय?.. अशा चर्चांचा सोशल मिडियावर सुळसुळाट झाला आहे.तर दीपिका पदुकोणची फिफा मधली उपस्थिती ही ट्रोलच्या तोंडावर थप्पड होता की काय? असेही बोलले जात आहे. शाहरूख खान आणि दीपिका पदुकोण यांचा आगामी चित्रपट 'पठाण' जानेवारीमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात शाहरूख खान दीपिका पदुकोण यांचा बरोबर जॉन अब्राहम देखील आहे. या वादावर पडदा टाकण्यासाठी हा स्टंट होता का, असे अनेकांना वाटते आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने