मॅकडोनाल्ड करणार तब्बल ५ हजार पदांची भरती; जाणून घ्या कुठे होणार बंपर भरती!

दिल्ली : क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट अशी ओळख असलेल्या मॅकडोनाल्ड्स इंडिया उत्तर आणि पूर्व भारतात सुमारे ५,००० लोकांना कामावर घेणार आहे. पुढील तीन वर्षात उत्तर आणि पूर्व भारतातील राज्यामध्ये मॅकडोनाल्ड्सला ३०० रेस्टॉरंट्सचा टप्पा पार करायचा आहे. अर्थात मॅकडोनाल्ड्स आपले आउटलेट दुप्पट करण्याचा विचार करीत आहेत, असही त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले.मॅकडोनाल्ड्सने देशात सर्वात मोठं रेस्टॉरंट गुवाहाटी येथे सुरू केलं आहे. या रेस्टॉरंटमध्ये एका वेळी 220 लोकांची बसण्याची क्षमता आहे. हे रेस्टॉरंट 6,700 चौरस फूट पसरलेले आहे. पीटीआयशी बोलताना मॅकडोनाल्ड्स इंडियाचे (उत्तर आणि पूर्व) व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन म्हणाले की, कंपनी वेगाने प्रगती करत आहे. त्यामुळे विविध राज्यांमध्ये आपले जाळे वाढविण्याचा विचार आम्ही करत आहोत.



मॅकडोनाल्डच्या पूर्वीच्या भागीदाराबरोबरच्या कायदेशीर बाबी निकाली निघाल्या का? या प्रश्नाला उत्तर देताना रंजन म्हणाले की, "सर्व समस्या आणि अडचणी आता मागे पडल्या आहेत. आम्ही केवळ आमचा व्यवसाय वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.2020 मध्ये, अमेरिकन फास्ट फूड चेनने एमएमजी ग्रुपचे अध्यक्ष संजीव अग्रवाल यांची उत्तर आणि पूर्व भारतातील आउटलेट चालविण्यासाठी नवीन भागीदार म्हणून निवड केली, कारण विभक्त भागीदार विक्रम बक्षी यांच्याकडून 50 टक्के हिस्सा खरेदी करण्यात आला होता. मात्र बक्षी यांनी बहुराष्ट्रीय मॅकडोनाल्ड्स कंपनीला दीर्घकाळापासून चाललेल्या कायदेशीर संघर्षात ओढले होते.

उत्तर आणि पूर्व भारतासाठी संजीव अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील एमएमजी गट आणि पश्चिम आणि दक्षिणेसाठी बी. एल. जाटिया यांच्या नेतृत्वाखालील वेस्टलाइफ ग्रुप या दोन मास्टर फ्रँचायझींच्या माध्यमातून मॅकडोनाल्ड्स भारतात कार्यरत आहेत. कंपनी सध्या उत्तर आणि पूर्व भारतात १५६ रेस्टॉरंट चालविते आणि येत्या तीन वर्षांत आउटलेटची संख्या दुप्पट करण्याचा विचार करीत असल्याचे रंजन म्हणाले.कर्मचाऱ्यांची संख्या आणि भविष्यातील भरतीच्या योजनांबद्दल विचारले असता ते म्हणाले की, "आमच्याकडे सध्या आमच्या रोलवर 5,000 हून अधिक कर्मचारी आहेत. जसजसा आमचा विस्तार होत जाईल तसतसे आम्ही सतत लोकांना कामावर ठेवू. तीन वर्षांत कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट होईल'. गुवाहाटीमधील नवीन आउटलेटबद्दल बोलताना रंजन म्हणाले की, हे उत्तर आणि पूर्व भारतातील मॅकडोनाल्डचे सर्वात मोठे रेस्टॉरंट आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने