पुणे पोलिसांकडून बनावट कॉल सेंटर उध्वस्त; लोनच्या नावावर व्हायची फसवणूक

पुणे: पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत मुंबईतील बनावट कॉल सेंटर उध्वस्त केलं आहे. या कॉल सेंटरच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाची उलाढाल आणि फसवणूक करण्यात येत होती. पुण्यातील दत्तवाडी पोलिसांनी ही मोठी कारवाई केली.कॉल सेंटरमधून फेक कॉल द्वारे लोकांना लुटलं जात होतं. मुंबईतील मुलुंडमध्ये हे कॉल सेंटर होतं. येथे ४३ जण काम करत होते. या कारवाईत चाळीस मोबाईल, सात हार्ड डिस्क व इतर साहित्य दत्तवाडी पोलिसांनी जप्त केलं. लोन देतो म्हणून अडीच लाखांची फसवणूक झाली होती.



बिनव्याजी रक्कम देतो म्हणून कॉल सेंटरमधून लोणची ऑफर दिली जात होती. तसेच बजाज फिन्सर कंपनीच्या नावाने ही लूट सुरू होती. "नमस्ते, मी बजाज फिनसर्व्ह लाईफ इन्शुरन्स कंपनीमधून सेल्स एक्झिकेटीव्ह बोलत आहे, असं येथील कर्मचारी नागरिकांना बोलत होते.कॉल सेंटरमधून फेक कॉल द्वारे लोकांना लुटलं जात होतं. मुंबईतील मुलुंडमध्ये हे कॉल सेंटर होतं. येथे ४३ जण काम करत होते. या कारवाईत चाळीस मोबाईल, सात हार्ड डिस्क व इतर साहित्य दत्तवाडी पोलिसांनी जप्त केलं. लोन देतो म्हणून अडीच लाखांची फसवणूक झाली होती.बिनव्याजी रक्कम देतो म्हणून कॉल सेंटरमधून लोणची ऑफर दिली जात होती. तसेच बजाज फिन्सर कंपनीच्या नावाने ही लूट सुरू होती. "नमस्ते, मी बजाज फिनसर्व्ह लाईफ इन्शुरन्स कंपनीमधून सेल्स एक्झिकेटीव्ह बोलत आहे, असं येथील कर्मचारी नागरिकांना बोलत होते.आरोपी हे महाराष्ट्रातील विविध शहरातील नागरिकांना फोन कॉल द्वारे बजाज इन्श्युरन्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करायचे.

 बजाज फिनसर्व्हची ५० लाख रुपयांची पॉलीसी काढल्यानंतर झिरो टक्के व्याज दराने पन्नास लाख रुपयांचे लोन मंजुर करुन देतो, असे सांगून नागरीकांकडुन त्यांचे आधारकार्ड, कॅन्सल चेक, फोटो या गोष्टी व्हॉटसअॅपवरुन घेवुन लोनचे सहा महिन्यांचे प्रिमीयम २,५०,०००/- रुपये होत असल्याचे सांगत त्या पैकी १,२५,००० रुपये लोन प्रिमियम म्हणून भरण्यास भाग पाडले जायचे. त्यानंतर नागरिकांची आर्थिक फसवणूक व्हायची.भारतीय दंडात्मक कलम ४१९, ४२० माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना या कॉल सेंटरमध्ये एकुण ४३ मुले-मुली वेगवेगळ्या ठिकाणी बसुन फोन कॉल करताना दिसून आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने