हातोड्यानेही फुटणार नाही 'हा' भन्नाट स्मार्टफोन, पाण्यातही वापरा; किंमत १५ हजारांच्या आत

दिल्ली : Rugged Smartphone बनवणारी कंपनी Doogee लवकरच आपला नवीन स्मार्टफोन बाजारात सादर करणार आहे. कंपनी Doogee S99 स्मार्टफोनला लाँच करणार आहे. या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी शानदार कॅमेरा मिळेल. फोन ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येईल, यात मुख्य कॅमेरा १०८ मेगापिक्सलचा असेल. याशिवाय, ६४ मेगापिक्सलचा नाइट व्हिजन कॅमेरा देखील दिला जाईल. Doogee S99 च्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.



Doogee S99 ची किंमत

Doogee S99 स्मार्टफोन २२ डिसेंबरला जागतिक बाजारात लाँच होणार आहे. या फोनची किंमत ३२९ डॉलर आहे. परंतु, लाँच ऑफर अंतर्गत फक्त १७९ रुपयात खरेदी करता येईल. फोनचा पहिला सेल २३ डिसेंबरपर्यंत चालेल. हँडसेटला AliExperess आणि Doogeemall वरून खरेदी करू शकता.

Doogee S99 चे स्पेसिफिकेशन्स

Doogee S99 फोन इतरांपेक्षा हटके फीचर्ससह येतो. फोनमध्ये हाय-क्वालिटी कॅमेरा मिळेल. यात ६.३ इंच FHD+ वॉटरड्रॉप डिस्प्ले मिळेल. यात मीडियाटेक हीलियो जी९६ चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. यात १५ जीबीपर्यंत रॅम (८ जीबी + ७ जीबी एक्सटेंडेड) आणि २५६ जीबी स्टोरेज मिळेल. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवू शकता.

फोनमध्ये मिळेल पॉवरफुल बॅटरी

Doogee S99 मध्ये ३३ वॉट थंडर चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. विशेष म्हणजे फोनवर पाणी पडले तरी खराब होत नाही. हा हँडसेट पडल्यानंतरही फुटणार नाही. यासाठी फोनला आयपी६८ आणि आयपी६९के रेटिंग मिळाले. कनेक्टिव्हिटीसाठी देखील तुम्हाला अनेक शानदार फीचर्स यात मिळतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने