माहिम वांद्रे खाडीलगत भीषण आग

मुंबई: मुंबईतल्या माहिम वांद्रे खाडीलगत भीषण आग लागली आहे. त्या परिसरात धुराचे मोठाले लोट दिसत असून कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.अद्याप या आगीचं कारण कळू शकलेलं नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. धुराचं प्रमाण पाहता आग मोठी असल्याचं दिसून येत आहे. ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.



संपूर्ण परिसरात धूर पसरला आहे. माहिम वांद्रे रेक्लेमेशन खाडीलगत ही आग लागली आहे. हा परिसर रहिवासी आहे का, इथे कोणती कंपनी आहे का, या विषयी अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही, तसंच जिवीत आणि वित्तहानीविषयीही अद्याप काही माहिती हाती आलेली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने