'तिने' देशासाठी गोल्डमेडल आणलं; पण दलित असल्यामुळे...

राजस्थान: राजस्थानच्या महिला बॉडीबिल्डरने देशासाठी गोल्ड मेडल आणलं आहे. तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. परंतु सरकाने तिला कसलीही मदत न केल्याचा ठपका ठेवण्यात येतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिया सिंगवर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.थायलंड येथील पटाया येथे १७ आणि १८ डिसेंबर २०२२ रोजी ३९ वी आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा होती. या स्पर्धेत राजस्थानची पहिली महिला बॉडीबिल्डर प्रिया सिंगने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तिने सुवर्णपदक आणि प्रो. कार्ड जिंकलं आहे. प्रियाने देशाचं नाव उज्ज्वल केल्याने सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.




प्रिया सिंग ही दलित समाजातील आहे. 'बाबासाहेबांच्या मुलीने देशाचं नाव उज्ज्वल केलं, देख रहे हो मनू.., गुलामीच्या बेड्या तोडून तिने इतिहास रचला' अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियामध्ये शेअर केल्या जात आहेत.प्रिया सिंगने आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदक जिंकूनही नरेंद्र मोदी किंवा राजस्थानच्या अशोक गहलोत सरकारने तिचा सन्मान केला नाही. थायलंडहून परतल्यानंतर ती एअरपोर्टवरुन घरी एकटीच गेली. एका मुलाखतीमध्ये प्रिया सिंगने जातीवादामुळे भेदभाव होत असल्याचं नमूद केलं आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी ट्विट करुन सरकारने प्रिया सिंगच्या प्रतिभेचा सन्मान केला नसल्याची खंत व्यक्त केली केली आहे. दलित असल्यामुळे प्रियावर अन्यात होत असल्याचा सूर सोशल मीडियामध्ये उमटत आहे. प्रियाने या सगळ्या पोस्ट तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने