चांगली कामे लोकांपर्यंत गेल्याने विजय; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सत्तारुढ खासदारांनी आज स्वागत-अभिनंदन केले. ‘स्वागत है भाई स्वागत है, मोदी जी का स्वागत है...’ या घोषणांनी बुधवारी संसदेच्या ग्रंथालयातील बालयोगी सभागृह दणाणून गेले होते. पक्षाची चांगली कामे लोकांपर्यंत नेली, त्यामुळेच गुजरातमध्ये सरकार आले. हा विजय खऱ्या अर्थाने गुजरातेतील भाजप कार्यकर्त्यांचा विजय आहे, असे सांगताना पंतप्रधानांनी, जनतेच्या विश्वासाला पात्र ठरावे असे काम केले तर आशीर्वाद मिळतोच, अशी भावना व्यक्त केली. जी-२० परिषदेच्या पूर्वतयारीबाबतही मोदींनी खासदारांना टिप्स दिल्या.






 गुजरात विजयानंतर प्रथमच भाजप संसदीय पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, भाजप संसदीय पक्षाचे प्रभारी व्ही. सतीश,  केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अश्विनी वैष्णव, गुजरातचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सी.आर पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. पंतप्रधान म्हणाले, की खऱ्या अर्थाने कोणाचे स्वागत करायचे असेल तर सी. आर. पाटील आणि नड्डा यांचे केले पाहिजे. आपण आज त्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले पाहिजे  ज्यांच्या अथक परिश्रमामुळे गुजरात पक्षसंघटनेत इतके काम झाले. मोदी म्हणाले, की संघटना बळकट करण्याच्या बळावरच कोणताही पक्ष एखाद्या राज्यात इतका सलगपणे जिंकू शकतो. कार्यकर्त्यांनी पक्षाची चांगली कामे लोकांपर्यंत नेली, त्यामुळेच गुजरातमध्ये सातव्यांदा भाजपचे सरकार आले. कार्यकर्त्यांच्या बळावर पक्ष निवडणुका जिंकू शकतो, गुजरातमधील विजयहे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असे मोदी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने