'अवतार'ची आयडिया 'हिंदू धर्मात'? 13 वर्षांनी दिग्दर्शकानं दिलं उत्तर

मुंबई : एक दोन नव्हे तर तब्बल तेरा वर्षे ज्या चित्रपटाची प्रेक्षकांनी आतुरतेनं वाट पाहिली तो अवतार द वे ऑफ वॉटर हा तीन दिवसांनी प्रदर्शित होतो आहे. येत्या १६ डिसेंबरला तो प्रेक्षकांना पाहता येणार आहे. अवतारच्या स्वागताची जोरात तयारी सुरु झाली आहे.ज्या दिग्दर्शकानं टायटॅनिक सारख्या चित्रपटातून साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते त्या जेम्स कॅमेरुन यांच्या संघर्ष, संयम आणि चिवटपणाला प्रेक्षकांनी सलाम केला आहे. आपल्या एखाद्या कलाकृतीबद्दल दिग्दर्शकर किती बारकाईनं आणि गंभीरपणे विचार करु शकतो हे कॅमेरुन यांच्याकडे पाहिल्यावर कळून येते. म्हणून तर अवतारचा पहिला भाग २००९ मध्ये आल्यानंतर दुसरा पार्ट यायला तब्बल तेरा वर्षांचा कालावधी लागला. सध्या अवतारची जोरदार चर्चा आहे.



सुरुवातीला सोशल मीडियावर जेव्हा ट्रेलर व्हायरल झाला तेव्हाच त्यावर आलेल्या प्रतिक्रियांनी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक किती आतूर आहेत हे दिसून आले होते. आता तर तो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. भारतात १६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. जेम्स कॅमेरुन यांच्या चित्रपटांविषयी प्रेक्षकांना नेहमीच कुतूहल असते. त्याच्या टायटॅनिक चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. ऑस्कर पुरस्कार जिंकण्याचा आगळा वेगळा विक्रम या चित्रपटाच्या नावावर आहे. सध्या या दिग्दर्शकाचा अवतार द वे ऑफ वॉटर चर्चेत आला आहे.सध्या एक गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ती म्हणजे अवतारची प्रेरणा त्या दिग्दर्शकाला कुठून मिळाली. याविषयीची आहे. त्यामध्ये त्यानं केलेला खुलासा हा लक्ष वेधून घेणारा आहे. एका मुलाखतीमध्ये कॅमेरुन आणि त्याच्या टीमनं आपल्याला या चित्रपटाची प्रेरणा हिंदू संस्कृतीतून मिळाल्याचे म्हटले आहे. अवतारमध्ये पुनर्जन्म दाखवण्यात आला आहे ती गोष्ट हिंदू धर्मातून आल्याचे मेकर्सचे म्हणणे आहे. कॅमेरुन यानं मुलाखतीतून यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

लंडनमध्ये अवतारच्या दुसऱ्या पार्टचे स्क्रिनिंग झाले होते. त्या स्क्रिनिंगला आलेल्या समीक्षकांनी, काही दिग्दर्शकांनी अवतारच्या दिग्दर्शकावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. असा चित्रपट पाहणे हा एक आनंददायी अनुभव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अनेकांनी दिग्दर्शकाची मेहनत सव्वा तीन तास तुम्हाला खिळवून ठेवते. अशा शब्दांत वर्णन केलं आहे.कॅमेरुन यांचे म्हणणे आहे की, हिंदू धर्मातील पौराणिक कथांमधून मी अवतार साकारला आहे. ६८ वर्षीय आणि मुळ कॅनडा येथे राहणाऱ्या कॅमेरुनच्या अवतारच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. जगभर या चित्रपटानं मोठी कमाई केली होती. त्याचा पहिला भाग हा २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. हिंदू धर्मामधील समृद्धता मोठी आहे. त्यापासून खूप काही शिकण्यासारखे आहे. माझ्या चित्रपटातील कित्येक गोष्टींचा संदर्भ हिंदू धर्म आणि त्यातील देवदेवतांशी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने