गोरक्षनाथांचा अपमान झालेल्या नेपाळात आहे दत्त गुरूंचे जागृत स्थान!

नेपाळ: नेपाळमध्ये जादातर बौद्ध धर्मिय राहत असले तरी तिथे अनेक हिंदू देवतांची मंदिरे आहेत. जगातील एकमेव हिंदूराष्ट्र म्हणून नेपाळ प्रसिद्ध आहे. काठमांडू या राजधानीपासून नऊ मैलावर पूर्वेस भटगाव हे गाव आहे. आनंदमय या राजाने हे गाव वसविलेले आहे. या गावात श्री दत्ता गुरूंचे जागृत देवस्थान आहे. पण, याच गावात गेले असताना गोरक्षनाथांना अपमानित करण्यात आले होते. काय आहे ती कथा पाहुयात.



काठमांडूभोवती अनेक हिंदू आणि बौद्ध देवतांचे दर्शन होते. मत्स्येंद्राचे मंदिर, भैरवाचे मंदिर, कृष्ण मंदिर, स्वयंभूनाथ मंदिर येथे आहे. येथील भाटगाव या गावात दत्त महाराजांचे मोठे मंदिर आहे. या मंदिराची रचना इतर मंदिरांप्रमाणे नाही हे प्रथम लक्षात येते. हे मंदिराची रचना बौध मठाप्रमाणेच आहे. हे दत्त मंदिर 15व्या शतकातील असून ते एकाच झाडाच्या लाकडापासून बांधण्यात आले आहे.या मंदिरात दत्तमूर्ती एकमुखी आणि द्विभुज आहे. हे दत्त महाराजांचे अती प्राचिन असे जागृत देवस्थान आहे. सन 1427मध्ये राजा यक्षमल्ल यांनी या मंदिराचे निर्माण केले. नंतर राजा विश्वमल्ल यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराशेजारी गणेश मंदिर देखील आहे. येथे दलादन ऋषींनी तपश्चर्या केली आहे.

गोरक्षनाथांचा झाला आपमान

देशाटन करत गोरक्षनाथ या भटगावात पोहोचले. येथे आल्यावर इथल्या लोकांनी त्यांचा अपमान केला. त्यामूळे गोरक्षनाथ क्रोधीत झाले. त्यांनी त्या गावावर अखंड जलवृष्टी करण्याचा आदेश वरूण राजाला दिला. तेव्हा सर्वत्र पूर आला आणि लोकांचे जीव जायची वेळ आली. त्यावेळी लोकांनी घाबरून दलदल ऋषींना साकडे घातले.ऋषी दलदलांनी श्री गुरुदेव दत्तांना या संकटातून मार्ग काढण्याची विनंती केली. श्रीदत्तकृपेने जलवृष्टी कमी झाली आणि लोकांचे नूकसानही थांबले. हेच दत्तलहरी नावाने प्रख्यात आहे. दत्तगुरूंचे आशीर्वाद मिळावेत यासाठी भटगाव येथे भगवान श्रीदत्तात्रेयांचे स्थान निर्माण झाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने