गुजरातमध्ये कसा आहे मतदारांचा प्रतिसाद?

गुजरात: आज गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये १४ जिल्ह्यांतील 93 मतदारसंघांमध्ये मतदान सुरु आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबादमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. गुजरात निवडणुकीचा हा शेवटचा टप्पा आहे.



गुजरातमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत १९.०६ टक्के मतदान पार पडलं आहे. त्यापूर्वी ९ वाजेपर्यंत ४.७ टक्के मतदान झालेलं.२०१७मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये या ९३ जागांपैकी ५१ जागांवर भाजपने विजय मिळवला होता. तर काँग्रेसने ३९ आणि अपक्षांनी ३ जागांवर यश मिळवलं होतं. परंतु उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसने १७ जागांवर तर भाजपने १४ जागांवर जय खेचून आणला होता.दरम्यान, आज सकाळी गृहमंत्री अमित शाह यांनी कुटुंबासोबत जात मतदानाचा हक्क बजावला. अहमदाबाद येथील नारणपुरा येथील केंद्रावर त्यांनी मतदान केलं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भावाच्या घरी गेले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत किती टक्के मतदान होतं, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने