होमगार्डना मिळणार 3 महिने तुरुंगात काम; महाराष्ट्रातल्या 252 जणांना तूर्तास लाभ

नाशिक : राज्यात ज्या ठिकाणी कारागृह आहे अशा ठिकाणी २५२ होमगार्डला कारागृहात फेब्रुवारी २०२३ पर्यंत रोजगार मिळणार आहे. त्यामुळे होमगार्ड संघटनेच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे होमगार्ड बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.राज्यातील ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नागपूर, अमरावती, अकोला, पंढरपूर, भंडारा, वाशीम, बुलडाणा, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, नंदुरबार, परभणी, नाशिक या ठिकाणच्या कारागृहांमध्ये २४८ पुरुष आणि चरा महिला अशा २५२ लोकांना महाराष्ट्रात रोजगार मिळणार आहे. यामुळे कारागृह विभागात असणारी कर्मचाऱ्यांची संख्या काही दिवस तरी भरून निघणार आहे.



होमगार्ड संघटनेने मागणी केल्यानुसार कायमस्वरूपी रोजगार मिळण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. शासनाच्या शाळा, महाविद्यालयांबरोबरच सरकारी आस्थापनांच्या सुरक्षाकरिता होमगार्डची नियुक्ती शासन विविध स्तरावर करीत आहे. सध्या कारागृह विभागात होमगार्डला काम करण्याची एक नवीन संधी उपलब्ध होणार आहे. यातून होमगार्ड बांधवांना संरक्षणाचे धडेही मिळणार आहेत. संशोधन आणि विकास या तत्त्वावर हा प्रयोग यशस्वी होणार असल्याचे होमगार्ड संघटनेने ‘सकाळ’चे बोलताना सांगितले आहे.कारागृहात होमगार्डला काम करण्याचा एक अनुभव मिळणार आहे. शासनाने परिपत्रक काढून ठिकठिकाणच्या कारागृहात कमी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि नेमणूक करावयाचे मनुष्यबळ याचा तक्ता प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार सध्या २५२ होमगार्ड बांधवांना रोजगार मिळणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. यातून होमगार्ड बांधवांना फेब्रुवारी २०२३ पर्यंत मानधन मिळणार असून, तीन महिने सेवा करण्याची शासन संधी देत आहेत."शासनाचे आभार मानतो. कारागृहात काम करण्याचा एक वेगळा अनुभव आम्हाला मिळणार आहे. या माध्यमातून मानधन आणि रोजगारही तीन महिने मिळणार आहे. कायमस्वरूपी बारा महिने रोजगार मिळावा, यासाठी आम्ही अनेकदा मागणी केली आहे, ती टप्प्याटप्प्याने पूर्ण होत असल्याचा आनंद असून, होमगार्ड बांधवांना दिलासा मिळाला आहे."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने