पुन्हा नोटबंदीचे संकेत! मोदींच्या मागणीनं अनेकांच्या उंचावल्या भुवया

 नवी दिल्ली : भारतात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली होती. त्यानुसार चलनातील १,००० रुपयांची नोट बंद करुन त्याऐवजी २,००० रुपयांच्या नोट चलनात आणण्यात आली होती.काळा पैसा रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं होतं. पण या निर्णयामुळं भारतीय अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम झाले होते. ज्या कारणासाठी ही नोटबंदी झाली होती. त्याचा उद्देश मात्र सफल होऊ शकेलेला नाही, हे खुद्द भाजपच्या खासदारांनीच सांगितलं आहे.



या नोटेमुळे काळ्या पैशात वाढ होत असल्यानं गेल्या तीन वर्षांपासून २ हजारांची नोट छापली जात नाहीए, त्यामुळं ही नोट बंद करण्यात यावी असंही या खासदारानं म्हटलं आहे.यापार्श्वभूमीवर "ज्या लोकांकडे २,००० रुपयांच्या नोट आहेत त्यांनी बँकेकडून त्या दुसऱ्या चलनात बदलून घ्याव्यात, कारण काही काळानंतर या नोटा चलतानातून पूर्णतः बाद होतील. कारण जगातील जितके विकसित देश आहेत ज्यामध्ये अमेरिका, जपान, चीन यांसारख्या देशांमध्ये कुठेही त्यांच्या चलनात १०० रुपयांच्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीचं चलन नाहीए. त्यामुळं भारतात मग दोन हजारांच्या नोटेचं काय औचित्य राहणार आहे.जसं आपण १,००० रुपयांची नोट बंद केली त्याप्रमाणं आता ५०० रुपयांनंतर २००० रुपयांच्या नोटीची गरज नाही" असं भाजपचे खासदार सुशील कुमार मोदी यांनी राज्यसभेत माहिती देताना म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने