जॅकलीन कोर्टात हजर... दिलासा नाहीच

मुंबई : जॅकलीन फर्नांडिसची चित्रपटामधूनही जितकी चर्चा झाली नसेल तितकी मनी लाँड्रिंग प्रकरणात झाली आहे. सुकेश चंद्रशेखर याने २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चित्रपट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोमवारी पटियाला हाऊस कोर्टात पोहोचली . फसवणूक प्रकरणी सहआरोपी जॅकलिनविरुद्ध आज न्यायालयात आरोप निश्चित केले जाणार होते, मात्र ईडीच्या विनंतीवरून सुनावणी पुढे ढकलण्यात आली. ईडीच्या विनंतीवरून या प्रकरणाची सुनावणी 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.




आजच्या सुनावणीदरम्यान, ईडीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की ते पुढील युक्तिवादासाठी अद्याप पूर्णपणे तयार नाहीत. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची तारीख निश्चित करण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली . ईडीच्या विनंतीवरून पटियाला हाऊस न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी या प्रकरणाची सुनावणी २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली.सुकेश चंद्रशेखरने खंडणीसह गुन्हेगारी कृत्यांमधून जॅकलीन फर्नांडिसला ५.७१ कोटींच्या विविध भेटवस्तू दिल्या होत्या. चंद्रशेखर बराच काळ तिचा साथीदार होता. सुकेशने सहआरोपी पिंकीच्या माध्यमातून जॅकलीनला या भेटवस्तू दिल्या होत्या’ असे ईडीने एका निवेदनात म्हटले होते. चंद्रशेखरने फर्नांडिसला भेटवस्तू देण्यासाठी बेकायदेशीर पैशांचा वापर केला, असा आरोपही ईडीने केला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने