खुळ्यांनो.. अनुराग कश्यप सैराट बद्दल चांगलंच बोलला.. खरं काय ते ऐका..

मुंबई : गेल्या दोन दिवसात बॉलीवुडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक- निर्माता अनुराग कश्यप चांगलाच चर्चेत आहे. एका कार्यक्रमात त्याने 'सैराट' आणि काही दाक्षिणात्य चित्रपतंबाबत भाष्य केले. यावेळी त्यांनी बॉलीवुड सह चित्रपट सृष्टीची चांगलीच खरडपट्टी काढली. यावेळी त्याने सैराट विषयी 'या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टी बरबाद केली' असे एक विधान केले आणि सर्वत्र हाहाकार मजला. अनुरागला बरेच ट्रोल केले गेले. पण ही विधान पूर्णतः विपर्यास करून दाखवले गेले. वास्तवात तो काही वेगळंच बोलला होता.जाणून घेऊया ही प्रकरण नेमकं काय आहे.



Galatta Plus’ आयोजित एका कार्यक्रमात बॉलीवुड दिग्दर्शक अनुराग कश्यप उपस्थित होता. यावेळी अनुरागने 'सैराट' चित्रपट आणि त्यांनंतर आलेले सिनेमे यावर भाष्य केले. या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टी बरबाद केली असे हे विधान होते. या विधान पूर्णपणे रंगवून दाखवले गेले. माध्यमात त्याची चुकीची चर्चा झाली. यावर नागराज अजून का बोलला नाही असेही बोलले गेले. पण मुळात अनुराग असं काही बोललाच नव्हता त्यामुळे नागराज नाराज होण्याचा प्रश्नच नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे तो जे काही बोलला ते नागराज समोरच बोलला.

सत्य असे आहे की, या कार्यक्रमात अनुराग आणि नागराज मंजुळे ही दोन्ही दिग्दर्शक उपस्थित होते. अनुराग स्टेजवर जाण्याआधीच त्याची आणि नागराजची चर्चा झाली होती. त्यानंतर अनुराग व्यासपीठावर गेला आणि म्हणाला, 'मी नागराजसोबत बोलत होतो. मी त्याला म्हणालो की, 'सैराट'ने मराठी चित्रपटसृष्टी उध्वस्त केली. कारण या चित्रपटाच्या यशामुळे मराठी चित्रपटात एवढे पैसे कमावण्याची ताकद आहे हे सगळ्यांना कळले. पण झालं असं की 'सैराट'ची सगळीकडे कॉपी झाली. एखादा चित्रपट चांगला चालला की लोक त्यातून काय शिकतात हे महत्वाचं आहे.' असे मार्मिक विधान त्याने केले होते. ज्यामध्ये कोणतेही चुकीचे भाष्य नव्हते. केवळ या प्रकरणाचे भांडवल केले गेले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने