कोरोनाच्या वाढत्या धोक्यात भारतीय लष्कराने जारी केली अ‍ॅडवायजरी

 दिल्ली: चीन, अमेरिका, जपानसह जगातील अनेक देशांमध्ये वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता भारतीय लष्करानेही अलर्ट जारी केला आहे. भारतीय लष्कराने सर्व सैनिकांना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच जवानांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत.जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, लक्षणे असलेल्या जवानांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. तसेच जे जवान पॉझिटिव्ह आढळून येतील त्यांना सात दिवस क्वारंटाईन केले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मध्यम ते गंभीर आजार असणाऱ्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केले जाईल.कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जवानांना फेस मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करणे, स्वच्छता राखणे, हँड सॅनिटायझरचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने