मार्केट डाऊन तरीही या शेयरला काही नाही नुकसान; तीन महिन्यात झाली सातपट कमाई

मुंबई : शेयर मार्केट म्हटलं की प्रत्येकाचे कान टवकरतात. शेयर मार्केटचे अपडेट ठेवूनच गुंतवणूक करता येते, रोज सकाळी उठल्यावर आधी स्टॉक्स मार्केट बघाव ही सवय तुम्हाला असेल किंवा तुम्ही ती इतरांमध्ये बघितलीही असेल.कोरोनाच्या दणदणाटामुळे शेअर बाजारात घसरण सुरूच असली तरी, काही गुंतवणूकदार एका कंपनीचे शेअर्स खरेदी करत आहेत आणि का करू नये, अवघ्या तीन महिन्यांत या शेयरने 710% एवढा जबरदस्त रिटर्न दिला आहे. आता कंपनीने बोनस आणि स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे.ही कंपनी TMT आणि बांधकामात वापरल्या जाणार्‍या राउंड बारची उत्पादक आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात तिचा नेट प्रॉफिट 2.35 कोटी रुपये होता. शेअर्समधल्या या तेजीनंतर कंपनीने बोनस आणि स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे.



Rhetan TMT स्टॉक 4% पर्यंत वाढला

शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण सुरूच राहिली. शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी गुरुवारी लाल चिन्हावर बंद झाले. पण असं असूनही, Rhetan TMT, TMT Sariya विकणाऱ्या SME कंपनीच्या शेयर्सने इनवेस्टर्स बरेच लक्ष वेधून घेतले. शेअर्समध्ये जोरदार खरेदीमुळे, इंट्रा-डेमध्ये जवळपास 4 टक्क्यांनी उसळी घेतली आणि 469.50 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला.

कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ

उच्चांक गाठल्यानंतर, Rhetan TMT च्या शेअर्समध्ये थोडीशी घसरण झाली. पण, व्यवहाराच्या शेवटी, जिथे सेन्सेक्स आणि निफ्टी तोट्याने बंद झाले, तिथे या कंपनीचे शेअर्स जवळपास 2 टक्क्यांनी वाढून 456 रुपयांवर बंद झाले. गेल्या तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 710 टक्क्यांचा जबरदस्त रिटर्न दिला आहे.

तीन महिन्यांपूर्वी ही किंमत होती

देशांतर्गत शेअर बाजारावर कोरोना विषाणूचे सावट असतानाही या शेअरबाबत गुंतवणूकदारांचा कल दिवसेंदिवस वाढतो आहे. गेल्या तीन महिन्यांतला RHETAN TMT शेअरच्या किंमतीतील बदल बघितलं तर, 5 सप्टेंबर 2022 रोजी बाजार बंद झाल्यावर या शेअरची किंमत 66.50 रुपये होती आणि गुरुवार, 22 डिसेंबर 2022 रोजी कंपनीच्या शेअरची किंमत रु.456 वर पोहोचली आहे.

कंपनीने बोनस जाहीर केला

Rhetan कंपनी TMT आणि बांधकामात वापरल्या जाणार्‍या राउंड बारची निर्माती आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात त्याचा नेट प्रॉफिट 2.35 कोटी रुपये होता. शेअर्समध्ये तेजीनंतर कंपनीने बोनस आणि स्टॉक स्प्लिटची घोषणा केली आहे. कंपनी 4 ऐवजी 11 बोनस शेअर जाहीर करेल. कंपनीचे बाजार भांडवल (MCap) 964.75 कोटी रुपये आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने