जगातील 500 प्रभावशाली मुस्लिमांची यादी जाहीर; भारतातून 'यांना' मिळालं स्थान, यादीत दहशतवाद्यांचाही समावेश!

दिल्ली: जगातील 500 प्रभावशाली मुस्लिम व्यक्तींची  यादी जाहीर करण्यात आलीये. या यादीत जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना मोहम्मद मदनी  15 व्या क्रमांकावर आहेत. यात भारतातील अनेक मुस्लिमांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे.जॉर्डनमधील रॉयल ऑल अल-बायत इन्स्टिट्यूट फॉर इस्लामिक थॉटनं  ही यादी जाहीर केलीये. याला 'रॅबिट' म्हणूनही ओळखलं जातं. ही एक इस्लामिक एनजीओ आहे. मदनी यांना 'मॅन ऑफ द इयर' देखील घोषित करण्यात आलं आहे. या अहवालात भाजप नेते कपिल मिश्रा यांचंही नाव आहे.सौदी अरेबियाचा राजा सलमान बिन अब्दुलअजीज अल सौद  यांनी 'मुस्लिम 500' या यादीत अव्वल स्थान पटकावलंय. इराणचे अयातुल्ला अली खामेनी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, तालिबान आणि हिजबुल्लासारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित लोकांनाही या यादीत स्थान मिळालंय.

भारतातील टॉप 50 मध्ये कोण?

रॅबिटनं जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांना 'पर्सन ऑफ द इयर 2023' ही पदवी प्रदान केलीये. 2023 मध्ये हा पुरस्कार मिळवणारे मदनी हे एकमेव व्यक्ती आहेत. जगातील सर्वात प्रभावशाली मुस्लिम व्यक्तींच्या यादीत ते 15 व्या क्रमांकावर आहेत. एनजीओच्या या अहवालात भारतावर जोरदार टीका करण्यात आलीये. यामध्ये लव्ह जिहादचाही उल्लेख करण्यात आला आहे.





यादीतील भारतीय व्यक्तींची नावं आणि मिळालेलं स्थान

  • शेख अबुबकर अहमद 144

  • हजरत अल्लामा मौलाना कमरुज्जमान आझमी 150

  • शबाना आझमी 183

  • बिल्किस बानो 164

  • सय्यद इब्राहिमुल खलील अल-बुखारी 144

  • डॉ. मोहम्मद उमर फारुख 137

  • डॉ. हसिमा हसन 175

  • मौलाना साद कांधलवी 144

  • आमिर खान 183

  • डॉ. सन्यासनैन खान 164

  • मौलाना सय्यद अर्शद मदनी 150

  • मौलाना महमूद मदनी 79

  • राबे हसनी नदवी 128

  • बहाउद्दीन मुहम्मद जमालुद्दीन नदवी 128

  • झाकीर अब्दुल करीम नाईक 117

  • मुफ्ती अबुल कासिम नोमानी 116

  • मौलाना शाकीर अली नूरी 144

  • खासदार असदुद्दीन ओवैसी 145

  • अझीम प्रेमजी 157

  • मौलाना बदरुद्दीन अजमल कासमी 157

  • अल्लाह रक्खा 183

  • डॉ. मुबीना रमजान 164

  • सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन 151

  • मौलाना जुहेर उल हसन 145

यादीत मुस्लिमांच्या 13 श्रेणींचा समावेश

रॅबिट एनजीओनं 500 लोकांची ही यादी जारी केलीये. यापैकी केवळ टॉप-50 श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. एनजीओनं निवडलेल्या 13 श्रेणींमध्ये इस्लामिक विद्वान, राजकारणी, धार्मिक व्यवहार प्रशासक, धार्मिक प्रचारक, आध्यात्मिक मार्गदर्शक, देणगीदार, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, वैज्ञानिक, कलाकार, कुराण वाचक आणि मीडिया व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये क्रीडा जगतातील दिग्गज आणि दहशतवाद्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने