अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारलेला 'अल कायदा'चा म्होरक्या अजूनही जिवंत! नव्या व्हिडिओनं जगात खळबळ

अमेरिका : जिहादी संघटनांच्या हालचालींवर नजर ठेवणाऱ्या अमेरिकास्थित गैर-सरकारी संस्थेनं एक मोठा खुलासा केलाय. SITE इंटेलिजन्स ग्रुपनं दावा केलाय की, 'अल कायदानं 35 मिनिटांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग जारी केलंय. यामध्ये त्यांचा नेता अयमान अल-जवाहिरीचा आवाज ऐकू येत आहे.'जवाहिरी हा यावर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये  अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला होता. आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर जवाहिरीच्या मृत्यूवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.



SITE इंटेलिजन्स ग्रुपनं म्हटलंय की, रेकॉर्डिंग कधी केलं गेलं याची माहिती मिळाली नाही. तसंच, अल जवाहिरीनं हा व्हिडिओ कधी रेकॉर्ड केला, हे त्यातील सामग्रीवरून स्पष्ट झालेलं नाही. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन हल्ल्यात जवाहिरी मारला गेला. 2011 मध्ये त्याचा संस्थापक ओसामा बिन लादेन  मारला गेल्यानंतर दहशतवादी गटासाठी हा सर्वात मोठा धक्का होता.

अमेरिकी प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, जवाहिरी अनेक वर्षांपासून लपून बसला होता. अल-जवाहिरीच्या मृत्यूनंतर अल-कायदानं उत्तराधिकारी नाव दिलेलं नाही, परंतु माजी इजिप्शियन स्पेशल फोर्स ऑफिसर सैफ अल-अदेल अल-कायदाचा उत्तराधिकारी मानला जात आहे. काबुलमध्ये मारला गेलेला अल कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरी याला हक्कानी तालिबान नेटवर्कनं काबूलमध्ये आश्रय दिला होता, असं अमेरिकेनं म्हटलंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने