मला बदनाम करण्याचा प्रयत्न, मी कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही; पेडणेकरांचं सोमय्यांना चॅलेंज

 मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या  यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. किशोरी पेडणेकर यांनी SRA वरळी इथं राहतं असं सांगितलं.मुंबई महापालिकेनं  त्यांची चौकशी केली. त्यातून महापालिकेनं अहवाल दिला की, पेडणेकर यांनी घुसखोरी करून ताबा घेतला आहे, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांच्या आरोपांना किशोरी पेडणेकर यांनी सडेतोड उत्तर दिलंय.



पेडणेकर म्हणाल्या, घर असणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. कारण, नसताना गरिबांना त्रास दिला जातोय. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, मी कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. ज्या घराचा माझा 11 महिन्यांपुरता संबंध असायचा, मग बाकीचा प्रश्न येतोच कुठे? असा सवाल त्यांनी केलाय.आपल्याकडं त्याच्या अनेक केसेस प्रलंबित आहेत. त्याच्यावर सरकारचं कुठंलही निवदेन नाही. किरीट सोमय्यांकडून सतत गरिबांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. माझी बदनामी केली जात आहे, असा आरोप पेडणेकर यांनी सोमय्यांवर केला आहे.

सोमय्यांनी का केला आरोप?

“दोन वर्षांपूर्वी तक्रार केली होती. आता त्यांना 48 तासांत गाळा रिकामा करावा लागणार आहे. पेडणेकर यांनी अनेक गाळे ढापले आहेत, त्यांनी कोरोना काळातही पैसे कमावले आहेत. आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका केलीय. तसंच मुंबई पोलिसांत तक्रार केलीय. हा आदेश निघालाय. त्याच आधारावर मी मुंबई पोलिसांकडं पुन्हा पाठपुरावा करणार की किशोरी पेडणेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने