रेल्वे प्रवासातही आता पाळावे लागणार विमानाचे नियम; वाचा नेमके बदल

मुंबई: सामान्य नागरीकाला प्रवास करण्यासाठी सर्वात परवडणारं माध्यम असणाऱ्या रेल्वेच्या सफरीलाही आता विमानाचे नियम लागणार आहेत. विमानाचा प्रवास करणाऱ्या लोकांना त्याचे नियम माहित असतात आणि तसे ते पाळलेही जातात. पण आता तसे काही नियम तुम्हाला रेल्वेने प्रवास करतानाही पाळावे लागणार आहेत.विमान प्रवासाला जाताना किती वजनाचे सामान न्यावे यावर निर्बंध आहे. पण रेल्वेने प्रवास करणारा सामान्य माणूस बऱ्याचदा आपलं बिऱ्हाडच जणू त्यातून वाहून नेत असतो. आता यावर निर्बंध येणार आहेत. रेल्वेने प्रवास करताना किती सामान न्यावं याचे नियम ठरवण्यात आले आहेत.



किती सामान नेता येणार?

रेल्वेने प्रवास करताना एक प्रवासी जास्तीत जास्त ५० किलो वजनाचं सामान सोबत घेऊन जाऊ शकतो. यापेक्षा जास्त सामान नेण्यासाठी भाडं मोजावं लागणार आहे. यासाठी तुम्हाला वेळं तिकीटंही खरेदी करावं लागेल. शिवाय प्रत्येक कोचसाठी याची मर्यादा वेगवेगळी आहे.

  • AC कोच साठी जास्तीत जास्त मर्यादा ७० किलोची आहे.

  • स्लीपर कोचसाठी सर्वाधिक मर्यादा केवळ ४० किलोची आहे.

सामानाचा आकार

रेल्वे प्रवास करताना सामानाच्या आकारावर पण नियम आहेत. जर मोठ्या आकाराचं सामान नेणार असाल तर त्यावर कमीत कमी ३० रुपयांचं शुल्क भरावं लागणार आहे. तर निर्धारीत मर्यादेपेक्षा मोठ्या आकाराचं सामान न्यायचं असेल तर दीड पट जास्त चार्ज लागणार आहे.

मेडिकल सामान नेण्यासाठी आहेत अटी

जर कोणासोबत रुग्ण प्रवास करणार असेल, तर त्यासोबत नेलं जाणारं औषधी सामान याविषयीदेखील नियम घालण्यात आले आहेत. केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावर ऑक्सिजन सिलेंडर आणि स्टँड नेता येणार.

हे सामान नेता येणार नाही

ज्वलनशील, विस्फोटक सामान नेता येणार नाही. अतिरीक्त शुल्क भरूनही १०० किलोपेक्षा जास्त सामान नेता येणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने