मोदी PM होतील; 450 वर्षापूर्वीचं नॉस्ट्राडेमसने वर्तवले होते भाकीत!

दिल्ली : जगप्रसिद्ध भविष्यकार नॉस्ट्राडेमसने जगभरात केव्हा काय होईल याचं भविष्य लिहून ठेवले आहे. अनेकदा त्यांच्या भविष्यांची चर्चादेखील होते. यातील काही भविष्य खरेदेखील ठरले आहेत.जगातील प्रसिद्ध ज्योतिषी नॉस्ट्राडेमने आधीच जगातील मोठ्या घटनांबाबत भविष्य लिहून ठेवेले आहे. यातील अनेक घटना सत्यातही उतरल्या आहेत. त्यामुळे अनेकांना आगामी काळात नेमकं काय घडणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. आज नॉस्ट्राडेमसची जयंती आहे. त्यानिमित्त भारताचे पंप्रधान नरेंद्र मोदींबाबत नॉस्ट्राडेमसने ४५० वर्षापूर्वी नेमकं काय सांगितले होते हे जाणून घेणार आहोत.



भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतही नॉस्ट्राडेमस सुमारे ४५० वर्षांपूर्वी भाष्य केले होते. ज्यामध्ये नॉस्ट्राडेमसने २०१४ मध्ये भारताच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान होतील अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली होती. त्यानंतर २०१४ मध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये ही भविष्यवाणी सत्यातदेखील उतरली. विशेष म्हणजे मोदी भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होतील ही भविष्यवाणी सुमारे ५०० वर्षापूर्वी वर्तवण्यात आली होती.

एवढेच नव्हे तर मोदी २० वर्षे केंद्रात सत्तेत राहतील, असेही भाकीत वर्तवण्यात आले आहे. प्रसिद्ध फ्रेंच स्तंभलेखक फ्रँकोइस गौटियर यांच्या मते, नॉस्ट्राडेमसने भारतात भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्या विजयाची भविष्यवाणी शंभर वर्षांपूर्वी केली होती. त्यांच्या ब्लॉगमध्ये ते लिहितात की, "बेम्परले दे ला रोशेफौकॉल्ट या प्रसिद्ध फ्रेंच विद्वानाला काही जुनी कागदपत्रे सापडली होती, जी त्याने 1876 मध्ये एका दुकानदाराला विकली."बॅम्प्रेल यांच्या मते, हे दस्तवेज लॅटिन भाषेमध्ये लिहिलेले होते आणि ते नॉस्ट्राडेमसचे होते. विशेष म्हणजे नॉस्ट्राडेमसने त्याच्या 'द प्रोफेसीज' या पुस्तकात फ्रेंच राज्यक्रांती, आण्विक हल्ले, अॅडॉल्फ हिटलर आणि 9/11 च्या हल्ल्याची भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने