फिफा वर्ल्डकप, चाहते, भारत अन्...; आनंद महिंद्रांचं 'ते' ट्वीट चर्चेत

कतार : फिफा विश्वचषकाचा शेवटचा टप्पा सध्या सुरू असून अर्जेंटिना संघ फायनलपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे त्यांच्या फॅनचा आनंद गगणात मावत नाहीये. या संघाचे चाहते आपला जल्लोष साजरा करत असून सेमीफायनलमध्ये ब्राझीलचा पराभव झाल्याने त्यांचे चाहते जरा नाराज आहे. यामध्ये भारतातील उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे ट्वीट चर्चेत आले आहे.



आनंद महिंद्रा यांनी ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "अर्जेंटिनाचे चाहते सध्या आनंद साजरा करत आहेत. ब्राझीलचे चाहते त्या गर्दीत आहेत, पण साहजिकच ते फारसे खूश नाहीत. विशेष म्हणजे हे चाहते भारतात आहेत. आम्ही अद्याप फुटबॉलमध्ये आमची गुणवत्ता दाखवली नसेल, परंतु जर 'फॅनबॉल'साठी विश्वचषक असेल तर आम्ही या स्पर्धेत धावत असू…" असं ट्वीट त्यांनी केलं आहे.दरम्यान, त्यांचं हे ट्वीट चांगलंच चर्चेत आहे. त्यांचं ट्वीट अनेकांनी ट्वीटरवर शेअर केलं असून जवळपास साडेतीन ते चार हजार लोकांनी त्यांनी शेअर केलेला व्हिडिओ लाईक केला आहे. त्यांनी शेअर केलेला एक मिनीटाचा व्हिडिओ सध्या भारतात असलेलं फुटबॉलप्रेम दाखवून देत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने