मेस्सीची 'जबरा फॅन' केरळच्या जुशना शाहीनच्या हट्टापायी नवऱ्याला सोडावा लागला देश

कतार: कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत अर्जेंटिना आणि ब्राझील या संघाचे सर्वाधिक पाठिराखे असल्याचे दिसून आले आहे. यात फक्त अर्जेंटिना आणि ब्राझीलमध्ये राहणारे चाहते नाहीत तर आशिया खंडातील विशेषकरून भारतातील फुटबॉल तेही मेस्सी आणि नेमारचे चाहते कतारमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. यावरूनच पाश्चिमात्य देशातील काही माध्यमांनी कतारने फेक फॅन्स गोळा केल्याचा जावई शोध लावला. मात्र याला सर्वांना केरळची लिओनेल मेस्सीची जबरा फॅन जुशना शाहीन एक सणसणीत चपराक आहे.



मेस्सी - जुशनाची पहिली भेट

जुशना शाहीन ही फुटबॉलची फॅन नाही तर ती मेस्सीची फॅन आहे. मेस्सी फुटबॉल खेळतो म्हणून ती देखील फुटबॉलशी जोडली गेली आहे. जुशना शाहिनच्या मेस्सी वेडाने तिच्या आई वडिलांनाच नाही तर नवऱ्याला देखील वेडं केलं आहे. जुशना शाहिन मुळची केरळ मधील असल्याने फुटबॉल हे तिच्या रक्तातच आहे. जुशनाने सर्वात प्रथम मेस्सीला 2010 च्या फिफा वर्ल्डकपमध्ये पाहिले. यावेळी तिने मॅरेडोना आणि मेस्सी असं चित्र डोळ्यात साठवून घेतलं होतं.तेव्हापासूनच फुटबॉलमधील मेसीहा (मेस्सी) ला पाहण्यासाठी ती वेडी झाली. याबाबत ती द क्विंटशी बोलताना म्हणाला की, 'मला वाटले की लिओ (मेस्सी) मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. मला त्याच्याकडून तो काय म्हणतोय ऐकायचं होतं. मात्र तो स्पॅनिश भाषेतच बोलत होता.' यानंतरच जुशनाने स्पॅनिश शिकण्याचा निर्धार केला.


मेस्सीसाठी स्पॅनिश शिकणारी जुशना

ज्यावेळी मेस्सीची अर्जेंटिना 2014 च्या फिफा वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात पोहचली होती. त्यावेळी जुशना ही जेएनयूमध्ये स्पॅनिशमधून एमए करत होती. जुशनाची स्पॅनिश भाषा शिकण्याची गोष्ट देखील खूप रंजक आहे. जुशना या बाबत सांगता म्हणाली की, 'मी घरातच स्पॅनिश शिकण्याचा प्रयत्न केला. मात्र ते खूप जड गलं. त्यानंतर मी 12 वी झाल्या झाल्या स्पॅनिश भाषेतून इंटिग्रेटेड एमए करण्यासाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अर्ज केला. मला प्रवेश मिळवण्यात यश आले.'जुशनाची मेस्सीला भेटण्याचे आणि स्पॅनिश शिकण्याची दोन्ही स्वप्ने योग्य मार्गावरून जात होती. मात्र कुटुंबीय यासाठी तयार नव्हते. जुशना याबाबत सांगते की, 'माझे कुटुंबीय मी स्पॅनिश शिकण्याबाबत फारसे उत्सुक नव्हते. त्यांना माहिती झाले होते की मी मेस्सीची मुलाखत घेण्यासाठी ही सगळी खटाटोप करत आहे. यामुळे मला कोणत्याच क्षेत्रात करिअर करता येणार नाही असे त्यांना वाटत होते. मात्र मी त्यांना सांगितले की मी या कोर्सनंतर युपीएसीची तयारी करणार आहे. मी इंडियन फॉरेन सर्व्हिसेससाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी मला स्पॅनिश भाषेचे ज्ञान उपयोगी पडेल.' जुशना यानंतर हसायला लागली.

जुशनाच्या मेस्सी प्रेमापायी पतीला सोडावा लागला देश

गेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिना फ्रान्सकडून राऊंड ऑफ 16 मध्ये पराभूत झाली. जुशना शाही यावेळी बार्सिलोनाला शिफ्ट करण्याबाबत विचार करत होती. मात्र 2019 मध्ये तिचे लग्न झाले. संसाराच्या धबडग्यात जुशना गर्भवती झाली. संसारात रमली. मात्र मेस्सी प्रेम अजूनही तिला स्वस्थ बसू देत नव्हतं. जुशनाने पती अवाद अहमदला तिला स्पेनमध्ये रहायचं असल्यांच सांगितलं. पतीने देखील तिला विरोध केला नाही. ते दोघेही स्पेनला शिफ्ट झाले. जुशना म्हणाली की, 'मला इंग्रजीची शिक्षिका म्हणून स्पेनमध्ये नोकरी मिळाली. आम्ही अंदालुसियाला शिफ्ट झालो. मात्र तेथुनही मेस्सी माझ्यापासून 1000 किलोमीटर लांब होता.'जुशनाचे पती देखील स्पेनला शिफ्ट झाले होते. याबाबत जुशना सांगते की, 'माझे पती कायम चेष्टेत म्हणतात की मेस्सीने माझे आयुष्य मेस्ड अप (वाट लावली) केलं.' आता मेस्सी आपला कतारमध्ये शेवटचा वर्ल्डकप खेळत आहे. जुशना हा फुटबॉल वर्ल्डकप स्पॅनिश 'पत्रकार' म्हणून कव्हर करतेय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने