जॅकलिन, नोरानंतर रकुल प्रीतलाही ईडीनं पाठवलं समन्स

मुंबई: बॉलिवूड विश्वावर सध्या वादाचे ढग दाटत आहे. त्यातच काही कलाकारंची ईडीकडून चौकशाही सुरु आहे. आता यातून टॉलिवूडचे कलाकारही सुटलेले नाहीत. रकुल प्रीत सिंग ही मनोरंजन विश्वातील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने खूप कमी कालावधीत लोकांच्या हृदयात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.रकुलने तिच्या छोट्या अभिनय कारकिर्दीत अनेक मोठ मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. मात्र, ज्याप्रमाणे तिच नाव यशस्वी कलाकारांसोबत जोगलं जातं तसंच तिचं नाव वादातही कायम आहे. अलीकडेच रकुलचे नाव टॉलिवूड ड्रग्ज मनी लाँडरिंग प्रकरणात समोर आले आहे . त्यानंतर ईडीच्या वतीने तिला समन्स पाठविले आहे.याआधीही रकुल प्रीत गेल्या सप्टेंबरमध्ये ईडीसमोर हजर झाली होती. आता पुन्हा एकदा तिला ड्रग्ज प्रकरणी 19 डिसेंबरला ईडीच्या कार्यालयात हजर व्हावे लागणार आहे. याआधीही ईडीकडून अनेक तेलुगू स्टार्सची चौकशी करण्यात आली आहे. ईडीने रकुलला समन्स बजावण्याची ही दुसरी वेळ आहे.याआधीही रकुल प्रीत गेल्या सप्टेंबरमध्ये ईडीस




२०२१ सालीही चौकशी ..

एवढेच नाही तर २०२१ मध्ये ईडीने रकुल प्रीतचीही चौकशी केली होती. जर वृत्तांवर विश्वास ठेवायचा असेल तर, या प्रकरणातील कथित मनी-लाँडरिंग या पैलूवर त्याची चौकशी केली जाईल. दाक्षिणात्य वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणी राणा दग्गुबती, पुरी जगन्नाथ, रवी तेजा, चार्मी कौर, नवदीप आणि इतर सेलिब्रिटींनाही नोटीस बजावण्यात आली आहे.मोर हजर झाली होती. आता पुन्हा एकदा तिला ड्रग्ज प्रकरणी 19 डिसेंबरला ईडीच्या कार्यालयात हजर व्हावे लागणार आहे. याआधीही ईडीकडून अनेक तेलुगू स्टार्सची चौकशी करण्यात आली आहे. ईडीने रकुलला समन्स बजावण्याची ही दुसरी वेळ आहे.

संपूर्ण प्रकरण नेमकं काय ?

2 जुलै 2017 रोजी टॉलिवूड ड्रग्ज रॅकेट उघड झाल्याची माहिती आहे. त्यादरम्यान कस्टम अधिकार्‍यांनी या प्रकरणी संगीतकार केल्विन मस्करेन्हास आणि इतर दोघांना अटक केली. त्याच्या अटकेनंतर चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून 30 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्यानंतर त्याने तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगितले की तो चित्रपटातील व्यक्ती, सॉफ्टवेअर अभियंते आणि काही कॉर्पोरेट शाळांच्या विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरवत होता.

त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये टॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींचे मोबाईल नंबर सापडले होते. गेल्या वर्षी या प्रकरणानंतरच टॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी ड्रग्ज पुरवठ्याच्या खळबळजनक रॅकेटप्रकरणी ईडीसमोर हजर झाले होते.आता याच प्रकरणात अनेक टॉलिवूड कलाकार ईडीच्या रडारवर आहेत. त्यातच आता रकुल प्रीतला हे समन्स बजावण्यात आलं आहे. यात अजून कोणकोणते कलाकार अडकतात हे लवकरच समजेलं...


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने