राष्ट्रवादीचं गुजरातमध्ये काय झालं? मागच्या वेळी काँग्रेसचा बिघडवला होता डाव

मुंबई : सध्या गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने दोन उमेदवार उभे केले होते. मागच्या वेळी स्वतंत्र लढलेल्या राष्ट्रवादीने काँग्रेसचा डाव बिघडवला होता. यावेळी दोन्ही पक्ष एकत्र लढले.गुजरातच्या १८२ जागांपैकी १७९ जागांवर काँग्रेसने उमेदवार दिले तर २ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिले होते. यामध्ये उमरेठ मतदारसंघात जयंत पटेल (बॉस्की) तर नरोडा विधानसभा मतदारसंघात मेघराज डोडवानी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवारी दिली होती.



मेघराज डोडवाना यांना फक्त ५ टक्ते मतं मिळवता आलेली आहेत. त्यांना ७ हजार ९६७ मतं मिळाली तर भाजप उमेदवार कुकर्णी पायल मनोजकुमार यांना १ लाख १२ हजार १९४ मतं मिळाली.दुसरीकडे जयंत पटेल यांनी उमरेठ मतदारसंघामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली. भाजप उमेदवार गोविंदभाई पारमार यांना ९५ हजार ३३५ मतं मिळाली तर राष्ट्रवादीचे जयंत पटेल यांना ६८ हजार ५३८ मतं मिळाली आहेत.२०१७च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात एक जागा पडली होती. राष्ट्रवादीने ५८ जागांवर निवडणूक लढवली. त्यापैकी ५६ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं. यावेळी मात्र राष्ट्रवादीला यश मिळालं नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने