'आप' दिल्लीपुरतच मर्यादीत...; BJPच्या विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई : गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री देखील निश्चित झाले आहे. या विजयामुळे भाजपमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. यावर आता भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय जनता पक्षच गुजरातचा विकास करू शकतो. मोदीजींच्या नेतृत्वातच भारत पुढं जावू शकतो हे गुजरातच्या जनतेने दाखवून दिलं. भाजपला ५२ टक्के मत मिळाली आहे. तर काँग्रेस निच्चांकी १६ जागांवर पुढे आहे. ज्यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला, अशा आप पक्षाचे १२ वाजले. जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारल्याची टीका फडणवीसांनी केली.



दरम्यान आप दिल्लीपुरत मर्यादीत हे गुजरातने दाखवून दिलं आहे. त्यामुळे मी गुजरातच्या जनतेचं अभिनंदन करतं. मी गुजरातला प्रचारासाठी गेलो होतो. त्यावेळीच गुजरातचा कल लक्षात आला होता. निवडून आलेल्या सर्व आमदारांचे अभिनंदन, असंही फडणवीस यांनी म्हटलं.विद्यमान मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल हेच मुख्यमंत्रीपदाची पुन्हा शपथ घेणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी ही घोषणा केली आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. भाजपनं या निवडणुकीत रेकॉर्डब्रेक जागा जिंकल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने