ओरायनचा पृथ्वीकडील प्रवास सुरू

अमेरिका : अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ने प्रक्षेपित केलेल्या आर्टिमिस वन मोहिमेला १६ दिवस पूर्ण झाले आहेत. चंद्राला प्रदक्षिणा घालून ओरायन यानाचा पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू झाला आहे.अंतराळयानाने शुक्रवारी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) चांद्रकक्षेतील ‘रेट्रोग्रेड डिपार्चर बर्न’ यशस्वीपणे पूर्ण केले. यात यानाचे मुख्य इंजिन एक मिनिट ४५ सेकंदापर्यंत सुरू करण्यात आले. यामुळे ओरायन चंद्राच्या कक्षेतून बाहेर पडून पृथ्वीकडे येण्यास सुरुवात झाली.



इंजिनच्या कक्षा बदलामुळे ओरायनचा वेग बदलून प्रतिसेकंद ४५४ फूट असा झाला. हे इंजिन ‘ऑर्बिटल मॅन्युव्हरिंग सिस्टम’च्या श्रेणीतील आहे. ओरायन यानासाठी त्यात सुधारणा करण्यात आली आहे. अवकाश क्षेत्रातील साधनांची निर्मिती करणारी एरोजेट रॉकेटडीन या अमेरिकी कंपनीने ही प्रणाली तयार केलेली आहे.मानवी चांद्रमोहिमेची चाचणी म्हणून अर्टिमिस वन मोहीम आखण्यात आली असून १६ नोव्हेंबर रोजी ओरायन अंतराळयान चंद्राकडे झेपावले होते. ११ डिसेंबरला ते प्रशांत महासागारात उतरणार आहे. त्यासाठी दोन वेळा कक्षा बदलण्यात येणार आहे. पहिला कक्षा बदल झाला असून दुसरा बदल सोमवारी (ता.५) होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने