पाकिस्तानचे भंगले स्वप्न! भारताचं काय होणार, कंस आहे गणित?

मुंबई:  जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरी गाठण्याचे पाकिस्तानचे स्वप्न भंगले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून पाकिस्तान बाहेर गेला आहे. त्याचा घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध 2-0 अशा पराभव केला. मुलतान कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 26 धावांनी पराभव केला. पाकिस्तानचा संघ 42.42% विजयाच्या टक्केवारीसह गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर घसरला आहे.त्याचबरोबर पाकिस्तानशिवाय इंग्लंडचा संघही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. इंग्लंड संघ 44.44% विजयाच्या टक्केवारीसह पाचव्या क्रमांकावर आहे. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकेल का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. याचं उत्तर हो आहे, पण टीम इंडियासाठी पुढचा रस्ता अजिबात सोपा नाही.




टीम इंडियाचे फायनल गाठण्याचे कंस आहे गणित ?

भारताला बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 4 कसोटी मालिका खेळायच्या आहेत. या 6 कसोटी सामन्यांमध्ये जर टीम इंडियाने 2 कसोटी सामने गमावले तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमधून भारताचा पत्ता कट होईल. त्याचबरोबर WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला बांगलादेशचा 2-0 असा पराभव करावा लागेल. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-1 किंवा 3-0 अशी मालिका जिंकल्यास भारताला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल.वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध 2-0 ने मालिका जिंकल्यानंतर त्यांच्या विजयाची टक्केवारी 75% वर गेली आहे. येथून ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत पोहोचणार हे जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ 60% विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या तर श्रीलंका संघ 53.33% विजयाच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने