दिग्गज फुटबॉलर पेलेंना झालाय कोलन कॅन्सर! या आजारात नेमकं काय होतं जाणून घ्या

मुंबई: जगप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू पेले यांची प्रकृती कोलन कॅन्सरमुळे खालावली आहे. मीडिया रिपोर्ट्नुसार त्यांच्यावर कीमोथेरपी झाली मात्र त्यांच्या प्रकृतीवर त्याचा पुरेसा फरक जाणावला नाही. मागल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ढासळली असून त्यांच्या शरीराचे अवयव निकामी झाले आहेत. पेलेंच्या किडनी आणि हार्टवर त्याचा मोठा प्रभाव झाल्याचे दिसून येते. या आजाराला रेक्टर कॅन्सरसर असेही म्हणतात.

कोलोरेक्टर कन्सर म्हणजे काय?

मोठ्या आतड्याला कोलन म्हणतात. कोलन रेक्टम आणि अॅनसला जोडतो. आणि ते पाचन तंत्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोलोरेक्टल कॅन्सर कोलन किंवा गुदाशयाच्या आतील भागात सुरू होतो त्याला पॉलीप असं म्हणतात.जेव्हा पॉलीपमध्ये कर्करोग तयार होतो, तेव्हा त्याचा हळूहळू गुदाशयाच्या भिंतीवर परिणाम होऊ लागतो. तुमच्या माहितीसाठी कोलन किंवा गुदाशयाच्या भिंती अनेक थरांनी बनलेल्या असतात. कोलोरेक्टल कॅन्सर सर्वात आतील थरापासून सुरू होतो आणि नंतर तो दुसऱ्या थरात पसरतो. त्यानंतर ते शरीराच्या इतर अवयवांमध्येही पसरू लागते.



कोलोरेक्टल कर्करोगाची लक्षणे

हा कर्करोगाचा असा प्रकार आहे ज्याची सुरुवातीची लक्षणे अजिबात दिसत नाहीत. त्यामुळे तुम्हाला स्वतः सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. 

आतड्यांच्या हालचालींच्या सवयींमध्ये बदल

स्टूल मध्ये रक्त येणे

काहीही खाल्ल्यावर शौचाला जाणे किंवा बद्धकोष्ठता

सतत ओटीपोटात वेदना किंवा पेटके

वजन कमी होणे

नेहमी उलट्या होणे

आतड्याचा कर्करोग टाळायचा असेल तर या गोष्टींची काळजी घ्या

वजनावर नियंत्रण ठेवा

धूम्रपान करू नका आणि तंबाखू खाऊ नका

दारू पिऊ नका

तुमच्या पोटात अणुवांशिक अल्सर तर नाही चेक करा

ऑटोइम्यून एट्रोफिक गैस्ट्रिटिस

या कर्करोगाचा अनुवांशिक इतिहास तर नाही ते जाणून घ्या

गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स

खारट, स्मोक्ड किंवा मसालेदार पदार्थ खाणे

कोलोरेक्टल कर्करोगापासून बचाव कसा करावा

लक्षणे दिसल्यास तपासणी करा

कर्बोदकांमधे भरपूर आहार घ्या

ऍस्पिरिन घेणे

निरोगी आहार योजनेचे अनुसरण करा

धूम्रपान किंवा मद्यपान टाळा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने