लिलावानंतर राजस्थान रॉयल्सचा भन्नाट पार्टी डान्स; VIDEO व्हायरल

मुंबई: राजस्थान रॉयल्स कायम इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही ना काही वेगळं, हटके करत असतं. नुकतेच कोचीच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडलेल्या आयपीएल 2023 मिनी लिलावानंतर राजस्थान रॉयल्सने एक फनी व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ अनिल कपूर यांच्या एका गाण्याचा व्हिडिओ मॉफ करून तयार करण्याता आला आहे.

या व्हिडिओत अनिल कपूर यांच्या चेहऱ्यावर राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालक कुमार संगकाराचा फोटो लावण्यात आला आहे. तर इतर लोकांच्या चेहऱ्यावर यंदाच्या लिलावात विकत घेतलेल्या खेळाडूंचे फोटो लावले आहेत. यात प्रमामुख्याने जो रूट आणि जेसन होल्डरचा समावेश आहेत. ही सगळी नवी रॉयल मंडळी पार्टी साँगवर नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.



दरम्यान, राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2023 च्या मिनी लिलावात एकूण 10 खेळाडूंची खरेदी केली. राजस्थानने वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार जेसन होल्डरला 5.75 कोटी रूपये बोली लावत आपल्या गोटात खेचले. तर अॅडम झाम्पासाठी 1.5 कोटी तर जो रूटसाठी 1 कोटी मोजले. याचबरोबर त्यांनी कुणाल राठोड, के. एम. आसिफ, डोनावेन फरेरा, मुर्गन अश्विन, आकाश वशिष्ठ, अब्दुल पी. ए आणि अब्दुल बशिष्ट यांच्यावर बोली लावल्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने