जेडीयू-राजदचे विलिनीकरण? CM नितीश कुमार म्हणाले, होय मी २०१५मध्येच...

नवी दिल्ली : लालू यादव यांचा पक्ष राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि नितीशकुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेड (जेडीयू) यांच्या विलिनीकरणाच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या सर्व चर्चांना आता पूर्णविराम दिला आहे. जदयूच्या विधीमंडळ बैठकीत नितीश कुमार म्हणाले, "राजद आणि जेडीयूच्या विलीनीकरणाची गरजही नाही आणि तसा प्रस्तावही नाही. मात्र होय, 2015 मध्ये, मी याबद्दल गंभीर होतो, परंतु आता असे काहीही नाही.



राजद आणि जेडीयूचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यापासून राजद आणि जेडीयूचे विलिनीकरण होणार अशी चर्चा सुरू झाली होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी नितीशकुमार यांनी विरोधी पक्षनेत्यांना भेटण्यास सुरुवात केली, तेव्हा या चर्चांना अधिक उधाण आले होते. यासह नितीशकुमार यांनी तेजस्वी यादव यांना भावी मुख्यमंत्री म्हणून संबोधल्यानंतर २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार बिहारची सत्ता तेजस्वी यादव यांच्याकडे सोपवू शकतात आणि जदयूला राजदमध्ये विलीन करू शकतात, असे बोलले जात आहे.

या चर्चांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही बळ दिले. बिहारमधील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सातत्याने जेडीयूचे राजदमध्ये विलीनीकरण करण्याचे विधाने केली. याबाबत जदयूकडून अनेकदा स्पष्टीकरण आलं, पण लोकांचा यावर विश्वास बसला नाही. आता नितीश कुमार यांनी याबाबत स्पष्ट नकार दिल्यानंतर जेडीयू आणि राजद विलिनीकर होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने