रेल्वेत परिक्षेशिवाय २४०० पदांवर होणार भरती, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: रेल्वे रिक्रुटमेंट सेल, सेंट्रल रेल्वेने बऱ्याच विभागांमध्ये अप्रेंटिस साठी २४२२ पदांवर भरती करण्यात येणार आहे. यात फिटर, वेल्डर, कारपेंटर, पेंटर, टर्नर, इलेक्ट्रीशियन, तंत्रज्ञ अशा वेगवेगळ्या विभागात भरती केली जाणार आहे.



अर्ज भरण्याची तारीख

यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रीया नुकतीच सुरू झालेली आहे. तर अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०२३ आहे. या भरतीसाठी कोणतीही प्रवेश परिक्षा घेतली जाणार नाही.

काय आहे पात्रता

  • १० आणि आयटीआय कोर्समध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर उमेद्वारांची निवड होणार आहे. याच मेरीटवर निवड करण्यात येईल.

  • यात उमेद्वार ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

वयो मर्यादा

  • उमेद्वार १५ डिसेंबर २०२२ पर्यंत १५ ते २४ वयोगटातील असावा.

  • या ओबीसी गटासाठी वयो मर्यादा १५ ते २७ असेल.

  • एससी, एसटी गटासाठी १५ ते २९ तर दिव्यांगांसाठी १५ ते ३४ वर्ष वयोगट मर्यादा आहे.

स्टायपेंड किती?

  • या पदासांठी स्टायपेंड ७००० रुपये असणार आहे.

  • अर्ज फी - १०० रुपये.

कसा करावा अर्ज

अर्ज ऑनलाईन करावा लागेल. www.rrccr.com या संकेतस्थळावरून अर्ज करावा.

आवश्यक बाब

ट्रेनिंगचा काळ एकावर्षाचा असेल. या नंतर कामावर ठेवलंच जाईल यासाठी नियुक्ती करणारा बांधील नसेल. तर नियुक्ती करणाऱ्याने सांगितलेल्या नोकरीवर रुजू होणं उमेदवारालाही बंधनकारक नसेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने