महादेवाचं अस्त्र करणार देशाचं रक्षण; भारत बनवतोय महेश्वरास्त्र!

 नवी दिल्लीः देवाधिदेव महादेवाच्या अस्त्रावरुन भारतात एक रॉकेट बनवलं जात आहे. हे लांब पल्ल्याचं गाइडेड रॉकेट असणार आहे. याचं नाव आहे महेश्वरास्त्र.पौराणिक कथांमध्ये महादेवाच्या अस्त्रांचा उल्लेख आहे. ज्यामध्ये भोलेनथांच्या तिसऱ्या डोळ्याचाही समावेश आहे. तिसरा डोळा उघडला तर कुणालाही भस्म करण्याची त्यात ताकद होती. सध्या भारतात जे रॉकेट बनवलं जातंय तेदेखील असंच शत्रूचा नाश करणारं आहे. त्याला देशी हिमार्स म्हटलं जातंय.



सोलार इंडस्ट्रिजच्या माध्यमातून 'महेश्वरास्त्र' बनवलं जात आहे. कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनी सांगितलं की, ही संकल्पना आम्ही भगवान शिवाच्या अस्त्रावरुन घेतली आहे. याची ताकदही तशीच आहे. ही गाइडेड रॉकेट सिस्टिम आहे. आम्ही याचे दोन व्हर्जन बनवत आहोत. महेश्वरास्त्र-१ आणि महेश्वरास्त्र-२. पहिल्या अस्त्राची रेंज १५० किलोमीटर इतकी असून दुसऱ्याची २९० किलोमीटर इतकी आहे.पुढच्या दीड वर्षांमध्ये भारताचं हे अजस्त्र अस्त्र तयार होणार आहे. या प्रोजेक्टसाठी ३०० कोटी रुपये खर्च आहे. या रॉकेटची गती हीच हेच याचं वैशिष्ट्य आहे. हे रॉकेट आवाजाच्या वेगाच्या चार पट अधिक लक्ष्य भेदू शकतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने