खेळणी, कपडे नको तर, आई-बाबांना...; चिमुरकडीचं सांताला पत्र

 मुंबई:अवघ्या काही दिवसांवर ख्रिसमसचा सण येऊन ठेपला आहे. लहान मुलांमध्ये या सणाची विशेष क्रेझ आहे. कारण ख्रिसमसला सांता भेटवस्तू देतो अशी धारणा लहानग्यांची आहे. यासाठी अनेक लहानपोरं सांताला चिठ्ठी लिहित गिफ्टची मागणी करतात.साधारणपणे ख्रिसमसकाळात लहानमुलं खेळणी मागतात. मात्र, सध्या एका ८ वर्षांच्या लहान मुलीनं सांताकडे एक मागणी केली आहे. तिचे हे पत्र सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, हे वाचल्यानंतर अनेकांच्या डोळे पाणावले आहेत. व्हायरल होणारे हे पत्र निकोल कोनेलने ट्वीटरवर शेअर केले आहे.






पत्रात नेमकं काय?

व्हायरल होणाऱ्या या पत्रात या लहान मुलीने सांताकडे खेळणी, कपडे न देता पालकांसाठी पैसे देण्याची मागणी केली आहे. आई-वडिलांची पैसे कमावण्यासाठी होणारी धडपड पाहून मला खूप वाईट वाटते. प्लिज सांता तू करू शकतो. मी करत असलेली मागणी खूप मोठी आहे याची मला कल्पना असल्याचेही या चिमुरडीने म्हटले आहे.

मुलीचं हे पत्र वाचून आणि तिने केलेली मागणी वाचून अनेक यूजर्सच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आहेत. पत्र लिहिणाऱ्या मुलीचं नाव एमी असे आहे. या पत्रावर लाखो यूजर्सने कमेंट केल्या असून, पोस्ट करणाऱ्या निकोलने ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना टॅग केले आहे. यावरून ही मुलगी आणि तिचे कुटुंब इंग्लंडमध्ये वास्तव्यास असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने