निवडणुक गुजरातची पण चर्चा मात्र, PM मोदींच्या शालीची

गुजरात : गुजरात विधानसभा निवडणुका सुरू आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. तत्पुर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरमध्ये आई हिराबेन मोदी यांची निवासस्थानी भेट घेतली. मात्र, चर्चा त्यांच्या भेटीची नसून तर त्यांनी घेतलेल्या शालची चर्चा अधिक रंगली आहे. कारण त्या केवळ शालीची किंमत १ लाखाहून अधिक आहे.राजकीय वर्तुळात नरेंद्र मोदींना केवळ पंतप्रधान, एक नेते म्हणून नव्हे तर स्टाईल आयकॉनही म्हटलं जातं. अनेकदा ते वेगवेगळ्या लूक मुळे चर्चेत असतात. अशातच सध्या राजकीय वर्तुळात त्यांनी घेतलेल्या शालची चर्चा अधिक रंगली आहे. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नरेंद्र मोदी यांनी आईची भेट घेत आशिर्वाद घेतला. यावेळीही त्यांनी आपल्या लुकने मीडियाचे लक्ष वेधून घेतले.मोदींनी यावेळी पोपटी रंगाचा कुडता पायजमा परिधान केला होता. मात्र, त्यांनी अंगावर घेतलेली शाल ही विषेश लक्षवेधी ठरली. त्याची एकूण किंमत ही 1,34,017.54 इतकी आहे.



या शालीचे वैशिष्ट्य काय?

मोदींनी अंगावर घेतलेली शाल ही कानी जमावर पश्मीना म्हणून ओळखली जाते. ही काश्मीरमध्ये बनवली जाते. जे येथील कानी कारागीर बनवतात. ही शाल हाताने विणलेल्या धाग्याने बनविली जाते. ही कानी शाल 70 पेक्षा जास्त लाकडी सुया वापरून विणलेली आहे. यामध्ये वापरलेली सामग्री उच्च दर्जाची काश्मिरी पश्मीना आहे जी लडाखमध्ये आढळते.

एक कानी शाल बनवण्यासाठी ६ महिने लागतात

कानी शाल हे दर्जेदार आणि कारागिरीचे अतुलनीय उदाहरण आहे. तालीम नावाच्या कोडेड पॅटर्नवर धागा ते धागा जोडून शाल कार्पेटप्रमाणे विणली जाते. कानी शाल फक्त काश्मीरमधील कानी कारागीर विणतात. ते विणण्यासाठी एकूण ६ महिने लागतात. ही शाल पूर्णपणे हाताने तयार केलेली आहे. काश्मिरी पश्मिना नैसर्गिकरित्या हस्तिदंती आणि तपकिरी रंगाची असते ज्याला रंगीत धाग्यात बदलण्यासाठी आणखी 15 मॅन्युअल प्रक्रियांची आवश्यकता असते.कानी शाल बनवण्यासाठी कारागिरांकडून प्रचंड संयम आणि अत्यंत एकाग्रतेची आवश्यकता असते कारण एक कारागीर विणल्या जाणार्‍या डिझाइनच्या गुंतागुंतीच्या आधारावर दररोज एक इंच इतके विणू शकतो. म्हणूनच एक कानी शाल विणण्यासाठी ६ महिन्यांपर्यंतचा कालावधी लागतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने