आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ ऑस्करसाठी सज्ज; राजामौलींच्या ‘RRR’शी होणार स्पर्धा

मुंबई: यंदा भारतीय चित्रपटांच्या ऑस्करवारीवरून बरेच वाद झाले. ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘आरआरआर’सारख्या जबरदस्त गाजलेल्या चित्रपटांना सोडून एका गुजराती चित्रपटाला ऑस्करला पाठवल्याने बरेच लोक नाराज झाले. ‘आरआरआर’ या चित्रपटाला तर नंतर बऱ्याच आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मानाचं स्थान मिळालं. एकंदरच यंदाच्या ऑस्कर निवडीबाबतही प्रेक्षक तसे नाराजच होते.आता संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ला पुढील ऑस्करसाठी पाठवण्याची तयारी सुरू असल्याचं वृत्त समोर आलं आहे. नुकताच हा चित्रपट ‘ब्रिटिश अकादमी फिल्म अवॉर्ड (BAFTA) २०२२’ या प्रतिष्ठित सोहळ्यासाठी सज्ज होत आहे. तोच या चित्रपटाच्या ऑस्करवारीबद्दल चर्चा सुरू आहे.



आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट हुसैन झैदी याच्या प्रसिद्ध ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर बेतलेला आहे. कामाठीपुरा वस्तीतील देहविक्री करणाऱ्या स्त्रियांच्या हक्कासाठी लढणाऱ्या गंगूबाईच्या जीवनापासून याची कथा प्रेरित आहे. मीडिया रीपोर्टनुसार या चित्रपटाला ऑस्करला पाठवण्याची तयारी सुरू असून वेगवेगळ्या श्रेणींमध्ये जसं की उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट पटकथा यासाठी या चित्रपटाला धडण्यात आलं आहे.इतकंच नव्हे बर्लिनमधील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’चं स्क्रीनिंग झालं आणि लोकांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला. ‘गंगूबाई काठियावाडी’ हा यावर्षीचा पहिला सुपरहीट हिंदी चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल १२९.१० कोटी इतकी कमाई केली होती. यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘भूलभुलैया २’ने सगळे रेकॉर्ड मोडीत काढले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने