ड्रॅगन रचणार इतिहास?; जाणून घ्या जगात चर्चिलं जाणारं अनोखं आंदोलन

चीन: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी झिरो कोविड पॉलिसीचे नियम कठोरतेने लागू केले आहे.तथापि, कठोर निर्बंधांमुळे सामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. सरकारच्या या कोठोर नियमांना विरोध करण्यासाठी गेल्या आठवड्यात लाखो लोकांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधी आंदोलन केले.आंदोलनाची ही आग शांघायपासून बीजिंगपर्यंत आणि वुहानपासून शिनजियांगपर्यंत पसरली. या आंदोलनाची दखस जागातील प्रमुख वृत्तपत्रांनी घेतली. या आंदोलनात आंदोलकांनी सरकारविरोधी निदर्शनांसाठी कोऱ्या कागदांचा सहारा घेतला. आज आपण संपूर्ण जगभरातील वृत्तपत्रांना दखल घेण्यास भाग पाडणारे 'ब्लँक पेज रिव्हॉल्यूशन' नेमके काय आहे आणि या आंदोलनामुळे चीनमध्ये इतिहास घडणार का? याबाबत जाणून घेणार आहोत.



काय आहे ब्लँक पेज रिव्हॉल्यूशन

चीनमध्ये निदर्शने होणे ही सामान्य बाब नसून सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाविरोधात निदर्शने करणे फार कठीण मानले जाते, मात्र यावेळी चिनी नागरिकांनी एकत्र येत एक अनोखा मार्ग शोधला. त्यासाठी त्यांनी कोरे पांढरे कागद हातात घेत सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

का वापरले जात आहेत कोरे कागदं?

चीनमध्ये सरकारविरोधी आंदोलनांसाठी वापरण्यात येणारी ही कागदं A4 आकारातील आहेत. या कागदांवर कोणतेही चिन्ह, फोटो किंवा मजकूर लिहिलेला नाही. अशा प्रकारचे आंदोलन हे सत्ताधारी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या मतभेदांच्या सेन्सॉरशिपवर प्रतीकात्मक टीका करणारे दर्शवते. त्याशिवाय कागदावर सरकार विरोधात कोणताही मजकूर लिहिलेला नाही. त्यामुळे सरकार आंदोलकांना अटक करू शकत नाही असे आंदोलकांचे मत आहे. त्यामुळेच अशा प्रकारे कोरी कागद घेऊन लाखो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. करण्यात येणाऱ्या या आंदोलनाला 'ब्लँक पेज रिव्होल्यूशन' शिवाय अनेकजण 'व्हाइट पेपर रिव्होल्यूशन' आणि 'ए4 रिव्होल्यूशन' असेही संबोधत आहेत.

'चीनमध्ये घडणार इतिहास

कम्युनिस्ट चीनच्या अकल्पनीय पतनाकडे जग उत्सुकतेने पाहत आहे, कारण विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, शी जिनपिंग यांनी झिरो कोविड धोरण सोडले नाही तर यामुळे चीनमध्ये आगामी काळात मोठा इतिहास घडू शकतो अशी शक्यता जगभरातून व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने