शिंदे-फडणवीसांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर सहकार खात्याची विशेष कृपा...

मुंबई : राज्यात सध्या उसाचा हंगाम आणि गाळप सुरू आहे. अनेक कारखाने हे आर्थिक परिस्थितीने त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून त्यांच्या जवळच्या लोकांच्या कारखान्यांना मदत केली जात आहे. आता सहकारी साखर कारखान्यांसाठी तयार करण्यात आलेल्या विस्तार योजनेंर्तगत ही मदत पुरवली जात आहे.राज्यात कमी गाळप क्षमता असलेल्या सहकारी साखर कारखान्यांसाठी तयार केलेल्या विस्तार योजनेंर्तगत शासकीय भागभांडवल प्राप्त करून घेणारा पहिला लाभार्थी मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांचा कारखाना ठरला आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या कारखान्यांनाही 34 कोटी रुपयांचे भागभांडवल राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आले आहे. यामुळे इतर कारखान्यांचे काय त्याच्या मदतीचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



राज्यात आताच्या घडीला 200 साखर कारखाने आहेत, त्यात 101 सहकारी साखर कारख्यान्यांचा व 99 खासगी कारखान्यांचा समावेश आहे. यापैकी 15 सहकारी साखर कारखान्यांची प्रतिदिन 1250 मे. टन गाळप क्षमता आहे. या कारखान्यांची गाळप क्षमता अत्यंत कमी असल्यामुळे अशा कारखान्यांमध्ये तयार होणारी साखर व इतर उपपदार्थ तयार होण्याचे प्रमाण इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी आहेत. तसेच त्यांचा उत्पादन खर्चही जास्त आहे.हे साखर कारखाने आर्थिकदृष्टय़ा सक्षम नाहीत. राज्यातील अशा 1250 मे. टन गाळप क्षमता असलेल्या कारखान्यांची दुप्पट म्हणजे 2500 मे.टन इतकी गाळप क्षमता वाढविण्यासाठी सहकारी साखर कारख्यांनांचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण करण्याची ही योजना तयार करण्यात आली आहे. शासकीय भागभांडवलाची ही रक्कम बिनव्याची आहे. भागभांडवल मिळाल्यानंतर तीन वर्षांपासून पुढील दहा वर्षांत समान हप्त्याने ही रक्कम वसूल केली जाणार आहे.

पवार यांनी 2014-19 मध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले. ज्या वेळी शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना गुवाहाटीला नेले, त्यावेळी शंभूराज देसाई त्यांच्यासोबत होते.अभिमन्यू पवार यांनी 2014-19 मध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे. तर ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले त्यावेळी त्यांना पाठिंबा देणाऱ्यापैकी शंभूराज देसाई होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने