मुंबईची हवा देशात सर्वात जास्त विषारी, दिल्लीलाही टाकले मागे

मुंबई: हवा प्रदुषण ही देशातील खूप मोठी समस्या आहे. गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीचा हवा प्रदुषणाचा दर वाढतानाच दिसत आहे. दिल्लीची विषारी हवेची गुणवत्ता वाढत असल्याने दिल्लीसह संपूर्ण देश चिंतेत होता. मात्र आता महाराष्ट्रासाठीही एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईची हवा देशात सर्वात जास्त विषारी असल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे मुंबईने दिल्लीलाही मागे टाकले. मुंबईच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी AQI लेवलची नोंद करण्यात आली. मलाडमध्ये हवेची गुणवत्ता 311 होती तर तर मंझगाव आणि चेंबूर मध्ये हवेची गुणवत्ता 303 होती. बांद्रा-कु्र्ला मध्ये AQI लेवल 269 नोंद करण्यात आली.



देशाची राजधानी दिल्लीच्या हवा प्रदूषणाची संपूर्ण जगात चर्चा होत असते मात्र याच मुंबईचं नाव आता समोर आलंय. रिपोर्टनुसार मुंबई मध्ये हवेची गुणवत्ता खूप गंभीर आहे. हवा प्रदूषणाच्या गुणवत्तेने 300 चा आकडा पार केलाय. सोमवारी मुंबईचा ओवरऑल AQI लेवल 225 नोंद करण्यात आला तर दिल्लीचा AQI लेवल 152 होता.या आकड्यावरुन मुंबईने दिल्लीलाही मागे टाकले. मात्र मुंबईच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे AQI लेवलची नोंद करण्यात आली. मलाडमध्ये हवा प्रदूषणाची गुणवत्ता 311 होती तर चेंबूरमध्ये 303 होती. बांद्रा-कु्र्ला मध्ये AQI लेवल 269 नोंदवण्यात आली.

मुंबईच्या प्रदूषणामागे कारण
काही दिवसापूर्वी जी 20 शेरपा अमिताभ कांत आणि नगर आयुक्त चहल यांनी केलेल्या बातचीतमध्ये मुंबईच्या वाईट एक्यूआई लेव्हलचा मुद्दा उठविण्यात आला होता. चहल यांनी या मोठ्या प्रदूषणामागे रिफाइनरी आणि टाटा पावर प्लांटला जबाबदार ठरविले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने