ठाकरे गटाला मोठा धक्का! सत्तासंघर्षाबाबतची 'ती' मागणी न्यायालयाने फेटाळली

मुंबई : शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि 40 कार्यकर्त्यांसह बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत उभी फुट पडली. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची यासाठी संघर्ष सुरू झाला. तर खरी शिवसेना कोणाची धनुष्यबाण चिन्हं कोणाचं याबाबत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून 5 सदस्यांची समिती नेमण्यात आली यावर उद्धव ठाकरे गटाकडून 7 न्यायाधीशांच्या घटना पिठापुढे सुनावणी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती.



तर ठाकरे गटाची ही मागणी न्यायालयाने नाकारल्याने ठाकरे गटाला धक्का मानला जात आहे. पाच न्यायाधीशांच्या सध्याच्या घटनापीठासमोर पुढील सुनावणी 10 जानेवारीला पार पडणार आहे.शिवसेनेच्या ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी हा खटला सात न्यायाधीशांसमोर चालवण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने ही मागणी आज फेटाळली आहे. यासंदर्भात सविस्तर आणि रितसर मागणी करण्याच्या सूचना कोर्टाने ठाकरे गटाला दिल्या आहेत. कपिल सिब्बल आता लेखी स्वरुपात ही मागणी सादर करतील.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने