बायकोचा टोमणा नवऱ्याला भोवला! ओव्हरवेटेड पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू...

 मुंबई :वजन वाढले म्हणून बरेच लोक स्ट्रेस घेतात. मात्र त्याचा तुमच्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम होऊ शकतो याची तुम्हाला कल्पनाही नसते. 444 किलो वजन झाले म्हणून पोलिस अधिकाऱ्याची बायको त्याला सोडून गेली. त्याचे वजन कमी करण्यात तो यशस्वी होत नाही तोवर त्याचा स्ट्रेस एवढा वाढला होता की त्यामुळे त्याला त्याचा जीव गमवावा लागला.दिवसेंदिवस बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातली सर्वाधिक चर्चेतील समस्या म्हणजे लठ्ठपणा. मात्र लठ्ठपणा आणि त्याचा स्ट्रेस किती जीवघेणा ठरतो ते तुम्हाला आजच्या या बातमीतून कळेल.होय, 444 किलो वजन असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा इमोशनल स्ट्रेसमुळे मृत्यू झालाय.




मृत व्यक्तीचं नाव एंड्रेस मोरेनो असे होते. हा व्यक्ती मॅक्सिकोला राहात होता. त्याचं वजन हळू हळू वाढत होतं. अथक प्रयत्नांनी त्याने त्याचं वजन कमी करण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. हळू हळू त्याचे वजन कमी होऊ लागले. सर्जरीनंतर त्याचे वजन 120 किलो कमी झाले होते. त्याचे वजन दिवसेंदिवस कमी होत चालले होते. मात्र इमोशनल स्ट्रेस आणि हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाला. वाढत्या वजनामुळे त्याच्या पत्नीची वागणूक बदलली. काही दिवसांतच ती त्याला सोडून गेली.

ओवरवेटमुळे बायकोनेही सोडलं

रिपोर्टनुसार 2015 मध्ये एंड्रेसचं वजन 444 किलो होतं. या कारणाने त्याला जगातील सगळ्यात लठ्ठ माणूस म्हणून ओळखले गेले. जन्मलेल्या बाळाचं साधारण वजन 2-3 किलोच्या दरम्यान असते. मात्र त्याचं वजन जवळपास सहा किलो होतं. दहा वर्षात त्याचे वजन 82 किलो होते.एंड्रिनो हा पोलिस अधिकारी होता. त्याचे लग्न झाले असून जसजसे त्याचे वय वाढले तसतसे त्याला हेल्थ इशूज उद्भवू लागले. पत्नी सोडून गेल्यानंतर तो फार स्ट्रेसमध्ये होता.

मोरेनोची सर्जरी होण्यापूर्वी फुटबॉल सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डोने ऑटोग्राफ दिलेला मॅड्रिड शर्ट त्याला देत मोटीवेट करण्यात आले होते. बायपास सर्जरीनंतर त्याच्या पोटाचा 70 टक्के भाग काढून टाकण्यात आला होता. मात्र अखेर रोनाल्डोच्या शुभेच्छाही व्यर्थ ठरल्या.एंड्रेनने मरण्याच्या आदल्या दिवशी 6 एनर्जी ड्रिंक पिल्या होत्या. त्यानंतर हार्ट अटॅक येऊन त्याचा मृत्यू झाला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने